मारहाणप्रकरणी मिंधे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल
शहरातील सातरस्ता परिसरात असलेल्या स्टार हॉटेलच्या चालकाला मारहाण करून मोबाईल हिसकावून नेल्याप्रकरणी मिंधे गटाचा जिल्हाप्रमुख मनीष काळजेविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळजेविरुद्ध नुकताच फसवणुकीचाही गुन्हा दाखल असताना हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने तो पोलिसांच्या रडारवर आला आहे.
सातरस्ता परिसरात वसीम ए. गफार पेराइमाम हा स्टार हॉटेल चालवतो. या हॉटेलमागे मिंधे गटाचा जिल्हाप्रमुख मनीष काळजे याने आपले कार्यालय थाटले आहे. या हॉटेलच्या बाजूला कार्यालयात जाण्यासाठी गेट आहे. रात्रीच्या सुमारास मनीष काळजेच्या गेटसमोर वाहन लावलेले होते. वाहन पाहून काळजे हॉटेलमध्ये घुसला व त्याने हॉटेलचालकाला शिवीगाळ करीत मारहाण केली. या वेळी त्याने हॉटेल पेटवून देण्याची धमकी दिली. या वेळी काळजेच्या चालकानेही मारहाण केली. या वेळी हॉटेलमधील एक कामगार घटनेचे मोबाईलमधून चित्रीकरण करत असल्याचे काळजे याने पाहिले. त्याने 22 हजार रुपये किमतीचा तो मोबाईलही हिसकावून नेला. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात मनीष काळजेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List