यवत दगडफेक प्रकरणी 17 अटकेत; गावात तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा चोख बंदोबस्त

यवत दगडफेक प्रकरणी 17 अटकेत; गावात तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा चोख बंदोबस्त

सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजपूर प्रसारित केल्याप्रकरणी यवत गावात 1 ऑगस्टला तणाव निर्माण झाला. दोन गटाकडून दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी आता पाच वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून,  17 जणांना अटक करण्यात आली आहे. तोडपह्ड प्रकरणात आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजपूर प्रसारित केल्यानंतर शुक्रवारी तणाव निर्माण झाला. शुक्रवारी सकाळी बाराच्या सुमारास दोन गट समोरासमोर आले. दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली. जमावाने वाहनांची तोडपह्ड केली, तसेच घरांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावास भेट दिली. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच शांतता पाळावी, असे आवाहन केले आहे.

‘यवत गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावात शांतता असून अनुचित घटना घडली नाही. ग्रामस्थांशी पोलिसांनी संवाद साधला आहे. शांतता बाळगावी, तसेच कायदा-सुव्यवस्थेला बाधा येईल, असे पृत्य करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

आक्षेपार्ह मजपूर प्रसारित करणाऱयाला पोलीस कोठडी

सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजपूर प्रसारित केल्यानंतर यवत गावात तणाव निर्माण झाला. आक्षेपार्ह मजपूर प्रसारित करणाऱयाला पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेऊन त्याला अटक केली. तरुणाला शनिवारी दौंड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी तरुणाला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;