भूपेश बघेल यांच्या घरी ईडीची धाड; मुलाला अटक, कथित दारू घोटाळाप्रकरणी कारवाई

भूपेश बघेल यांच्या घरी ईडीची धाड; मुलाला अटक, कथित दारू घोटाळाप्रकरणी कारवाई

कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी आज छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या भिलई येथील निवासस्थानी ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने धाड टाकली. या कारवाईत भूपेश बघेल यांच्या मुलाला अटक करण्यात आली. पहाटे टाकलेल्या छाप्यानंतर ईडीने चैतन्य बघेल यांना ताब्यात घेतले. भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या कथित मद्यधोरण घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कारवाईदरम्यान बघेल यांच्या घराबाहेर बॅरिकेड्स उभारण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले आणि बघेल यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी दिली. बॅरिकेड्स तोडून बघेल यांच्या निवासस्थानी परिसरात सर्वजण गोळा झाले. छत्तीसगडमधील कथित दारू घोटाळ्यात 2100 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा ईडीचा दावा आहे.

ही भेट आयुष्यभर लक्षात राहील

मोदी आणि शहा यांनी दिलेल्या भेटवस्तू जगातील कोणत्याही लोकशाहीत कोणीही देऊ शकत नाही. माझ्या वाढदिवशी, दोन्ही या आदरणीय नेत्यांनी माझ्या सल्लागाराच्या आणि दोन ओएसडींच्या घरी ईडी पाठवली होती. आता माझा मुलगा चैतन्यच्या वाढदिवशी ईडीने माझ्या घरावर छापा टाकून मुलाला अटक केली. या भेटवस्तूंसाठी धन्यवाद! मी त्या आयुष्यभर लक्षात ठेवीन, असेही भूपेश बघेल म्हणाले.

मालकांना खूश करण्यासाठी ईडीला पाठवले

विधानसभेत सभागृहात आम्ही तमनारमध्ये अदानींसाठी तोडल्या जाणाऱ्या झाडांचा मुद्दा उपस्थित करण्याच्या तयारीत होतो, तेव्हा मोदी आणि शहा यांनी त्यांच्या मालकांना खूश करण्यासाठी ईडीला माझ्या घरी पाठवले. ते देशभरातील विरोधी नेत्यांना लक्ष्य करत आहेत. असा आरोप भूपेश बघेल यांनी केला. कितीही प्रयत्न केला तरी मी झुकणार नाही, मोडणार नाही, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा! किती धोकादायक हा आजार, त्यावर उपचार काय? डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा! किती धोकादायक हा आजार, त्यावर उपचार काय?
जगातील सर्वात चर्चित चेहरा म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. पण सध्या ते एका आजाराने त्रस्त झाले आहेत. त्यांच्या आरोग्यविषयक अहवालाने...
महाड MIDC तील कंपनीला आग, अग्रिशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
मुंबई-गोवा महामार्गावर केमिकल वाहून नेणारा टँकर पेटला, पन्हळे माळवाडी येथील घटना
Video – Uddhav Thackeray Interview | Part – 1 | निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या! – उद्धव ठाकरे
भाजपचाच बाप मुंबई तोडणार! संजय राऊत यांचा घणाघात, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानाचा खास शैलीत समाचार
भाजप गुन्हेगारांचे आश्रयस्थान, गुन्हा करायचा, पक्षात जायचं अन् आमदार, खासदार, मंत्री व्हायचं; संजय राऊत यांची टीका
जन्मदात्याला मुलाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण; उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू