एके 203… खतरनाक गन! मिनिटात 700 गोळ्या झाडणार
On
हिंदुस्थानी लष्कराला लवकरच एकदम खतरनाक अशा ‘एके 203’ रायफलींचा नवा साठा मिळणार आहेत. तब्बल 7 हजार एवढ्या या रायफली आहेत. त्यांची रेंज 800 मीटर आहे. त्यातून एका मिनिटांत 700 राऊंड गोळ्या सटासट मारता येतील. ‘एके 203’ गनची निर्मिती हिंदुस्थान आणि रशिया दरम्यान झालेल्या करारात उत्तर प्रदेशातील अमेठी येथे होतेय. जगातील सर्वाधिक घातक रायफल अशी तिची ओळख आहे.
या बंदुकीचे वैशिष्ट्ये काय?
- एके 203 रायफलीतून 7.62 बाय 39 एमएम गोळ्या मारल्या जातील. त्याची रेंज 800 मीटर आहे. एवढ्या दीर्घ अंतरापर्यंत गोळ्यांची ताकद टिकून राहील.
- रायफलची लांबी 37 इंच आहे. तिला छोटे करून 27.8 इंच केले जाऊ शकते. त्याच्या बॅरेलची लांबी 16.3 इंच आहे. गरजेनुसार रायफलीची लांबी कमी-जास्त करू शकतो.
- प्रत्येक मिनिटाला 700 गोळ्या सुटतील. सिंगल मोडमध्ये एकदा ट्रिगर दाबल्यावर एक गोळी फायर होऊ शकते. फुल ऑटो मोडमध्ये ट्रिगर दाबल्यावर गोळ्या सटासट सुरू होतील. मॅगझीन संपेपर्यंत गोळ्या सुटतील.
- एके 203 ही गॅस ऑपरेटेड रायफल आहे. एके 47 सारखा तिचा वापर करणे सोपे आहे. जास्त मेंटेन्सची गरज नाही.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
19 Jul 2025 20:04:28
आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी ठेवल्या जातात ज्या अन्नाची चव वाढवतात पण त्या हळूहळू आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्या...
Comment List