सांगलीत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

सांगलीत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

काही दिवसांपूर्वी कुपवाड येथे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्यानंतर आता पुन्हा मुंबई पोलिसांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथील एका शेतात सुरू असलेल्या कारखान्यावर छापा टाकून पर्दाफाश केला. पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या पथकाने या कारखान्यातून 100 किलो एमडी ड्रग्ज जप्त केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांकडून अजून तपासणी सुरू असून कारखान्याचा मालक कवठेमहांकाळ येथील असल्याचे समजते. मुंबई पोलिसांच्या कारवाईने जिह्यात खळबळ उडाली आहे.

गेल्या महिन्यात पुणे पोलिसांनी कुपवाड येथून तीनशे कोटी रुपये किमतीचे 140 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले होते. या प्रकरणी ड्रग्ज प्रकरणातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आयूब मकानदार याला अटक करण्यात आली होती. 2015 नंतर सांगलीचे एमडी ड्रग्ज कनेक्शन पुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आले होते. दरम्यान, आता मुंबई क्राईम ब्रँचचे निरीक्षक नीरज उबाळे यांच्या पथकाने जिह्यातील ड्रग्ज निर्मिती कारखानाच उद्ध्वस्त केला आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे ड्रग्ज निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची माहिती निरीक्षक उबाळे यांना मिळाली. त्यानंतर त्यांच्यासह पथकाने रविवारी रात्रीपासून इरळी येथे ठाण मांडले होते. इरळीतील एका शेतात एमडी ड्रग्ज निर्मितीचा गोरखधंदा सुरू होता. येथे मुंबई पोलीस पथकाने छापा मारला. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार 100 किलोहून अधिक वजनाचे एमडी ड्रग्ज येथे असल्याची माहिती आहे. दरम्यान, इरळीतील कारखान्याचा मालक हा कवठेमहांकाळ येथील असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचे निरीक्षक उबाळे यांनी सांगितले. मुंबई क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, निरीक्षक आत्माजी सावंत यांच्यासह आठ ते दहा अधिकारी, कर्मचाऱयांचे पथक ही कारवाई करीत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;