जायकवाडी धरण 91 टक्के भरले, 18 दरवाजे उघडले; जलविसर्ग सुरू
पैठणमधील जायकवाडी धरण 91 टक्के क्षमतेने भरल्यामुळे धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आणि गोदावरी नदीपात्रात 9 हजार 432 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नाथसागर जलाशयात सध्या 16 हजार 123 क्युसेक याप्रमाणे पाणी दाखल होत आहे. धरण तुडूंब भरले असून दोन्ही कालव्यांतूनही 2 हजार 200 पाणी सोडण्यात येत आहे. नाशिक व अहिल्यानगर परिसरात पडलेल्या पावसामुळे गेल्या 42 दिवसांपासून जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाणी दाखल होत आहे.
वरच्या भागातील छोट्या मोठ्या धरणांतूनही खालील प्रमाणे पाणी सोडण्यात येत असून हा जलौघ गोदावरी नदीच्या माध्यमातून नाथसागरात येत आहे. दारणा 2 हजार 486, नांदुर मधमेश्वर 9 हजार 465, वालदेवी 407, 2021 भावली 290, भाम 1 हजार 651, वाकी 276, कडवा 2 हजार 52, वाघाड 1 हजार 192, गंगापूर 1 हजार 235, गौतमी गोदावरी 262, पालखेड 738 व कश्यपी 480 क्युसेक आदी.
गोदाकाठच्या ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन
दरम्यान धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. या पाण्यामुळे नदिकाठच्या गावांमध्ये पुराची शक्यता आहे. नदी पात्रात जलफुगवटा होऊन पुरस्थीती उद्भवू शकते. त्यामुळे पैठण शहरासह गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गावातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. नदिच्या पाण्यात जाऊ नये. काठावर असलेल्या वस्त्यांमध्यील गुरेढोरे, कृषी साहित्य, शेतीमाल व विद्युत मोटारी काढून सुरक्षीत ठिकाणी हलवाव्या, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जायकवाडी धरण 91 टक्के भरले, 18 दरवाजे उघडले; जलविसर्ग सुरू#jaikwadi #jaikwadidam #video pic.twitter.com/O2lp38TZuv
— Saamana Online (@SaamanaOnline) July 31, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List