जनसुरक्षा विधेयकाला मान्यता देऊ नका; महाविकास आघाडीची राज्यपालांकडे मागणी
शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणल्याचा दावा सरकारने केला आहे. मात्र या कायद्याचा वापर विद्यार्थी, कामगार संघटनांच्या विरोधात होण्याची भीती आहे. विधेयकामध्ये असलेल्या त्रुटी व या विधेयकामुळे सामान्य नागरिकांवर होणारा परिणाम या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि जनसुरक्षा विधेयकाला मान्यता देऊ नका अशा मागणीचे पत्र दिले.
महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयकाला मान्यता देऊ नका, अशी मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली. @iambadasdanve pic.twitter.com/qrOIlPQLla
— Saamana Online (@SaamanaOnline) July 18, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List