पुण्यात मुठा नदीला पूर; भिडे पूल पाण्यात, खडकवासलातून 8 हजार क्युसेक पाणी सोडले

पुण्यात मुठा नदीला पूर; भिडे पूल पाण्यात, खडकवासलातून 8 हजार क्युसेक पाणी सोडले

पुणे  जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणलोटमध्ये गेल्या तीन-चार दिवसांत झालेल्या पावसामुळे बहुतांशी धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱया वरसगाव धरणातून आज सकाळी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर खडकवासला धरणातून सायंकाळी 18 हजार 483 क्युसेक पाणी मुठा नदीमध्ये सोडण्यात आल्याने नदीला पूर आला असून भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. चासकमान धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. नीरा देवघर, भाटघर, पवना, आंद्रा, मुळशी, वीर या धरणांतूनही पाणी सोडण्यात आले.

उजनीचे 16 दरवाजे उघडले
भीमा खोऱयातील 10 धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. दौंड येथून सायंकाळी 26 हजार क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत असल्याने उजनी धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आली आहेत. आंद्रा, कळमोडी, विसापूर ही तीन धरणे 100 टक्के भरली आहेत. तर, कासारसाई, चासकमान, घोड धरणे 91 टक्के भरली आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;