देव तारी त्याला… डॉक्टरांनी मृत घोषित केले; घरी जाताच बाळ जिवंत झाले! अंबाजोगाई येथील चमत्कार

देव तारी त्याला… डॉक्टरांनी मृत घोषित केले; घरी जाताच बाळ जिवंत झाले! अंबाजोगाई येथील चमत्कार

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय हा एक अजब चमत्कारच आहे. या रुग्णालयात बुधवारी रात्री एक बाळ जन्माला आले. बाळ हालचाल करत नव्हते. डॉक्टरांनी तपासून त्या बाळाला मृत घोषित केले. नशिबाला दोष देत बाळ पिशवीत टाकून अंत्यसंस्कारासाठी घरी नेण्यात आले आणि काय चमत्कार… बाळाचे चलनवलन सुरू झाले…! घरच्यांनी बाळाला घेऊन स्वाराती गाठले. सध्या या बाळावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

अंबाजोगाई तालुक्यातील होळ येथील बालिका घुगे ही महिला प्रसूतीसाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल झाली. गर्भाशयाचे तोंड फुटल्याचे तपासणीत निदर्शनास आले. मुदतपूर्व प्रसूती होऊन तिने बाळाला जन्म दिला. बाळाचे वजन 900 ग्रॅम असल्यामुळे त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आले. रात्रभर पेटीत ठेवूनही बाळ हालचाल करत नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित करून आजोबाच्या स्वाधीन केले.

आजोबांनी मृत बाळ पिशवीत टाकून 17 किमी अंतरावर असलेल्या होळ या गावी अंत्यसंस्कारासाठी नेले. अंत्यसंस्कारासाठी आजीने बाळाला पिशवीतून बाहेर काढले. बाहेर काढताच बाळाने हालचाल केली आणि रडायला सुरूवात केली. बाळ जिवंत असल्याचे पाहून नातलगांना सुखद धक्का बसला. बाळाला घेऊन पुन्हा घुगे कुटुंब स्वाराती रुग्णालयात आले. बाळ जिवंत असल्याचे उपचार पाहून डॉक्टरांचे डोळेच पांढरे झाले. या बाळावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने दोन समित्या नेमल्या आहेत. या समित्यांचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रभारी अधिष्ठातांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पुनर्रचना, बेलापूर आता नवे परिमंडळ; आयुक्तालयात तीन उपायुक्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पुनर्रचना, बेलापूर आता नवे परिमंडळ; आयुक्तालयात तीन उपायुक्त
नवी मुंबईतील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, नागरीकरण आणि कायदा-सुव्यवस्था या आव्हानांचा विचार करून राज्य सरकारने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पुनर्रचना करण्याच्या...
वृद्ध मातापित्यांना सांभाळण्यासाठी 30 दिवसांची भरपगारी रजा, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय
ड्युटीवर असताना मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 50 हजार रुपये, पीएफ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
इंटेल 24 हजार कर्मचाऱ्यांना काढणार, खर्च कपातीसाठी कंपनीचा निर्णय
अश्लील कंटेट भोवले; 25 अ‍ॅप्सवर बंदी
सीईओ सुंदर पिचाई अब्जाधीशांच्या यादीत
ऑगस्ट महिन्यात 16 दिवस बँका बंद राहणार