आटपाट नगर होतं….श्रावण महिन्यातील उत्कंठावर्धक आणि रोचक कहाण्या…

आटपाट नगर होतं….श्रावण महिन्यातील उत्कंठावर्धक आणि रोचक कहाण्या…

>> योगेश जोशी

प्रत्येकाने लहानपणी अनेक गोष्टी ऐकल्या असतीलच की नाही.. या गोष्टीतील सर्वात रंजक सुरुवात असायची आटपाट नगराने. आजच्या संगणकाच्या युगात आटपाट नगर इतिहासजमा झाले आहे. तसेच विभक्त कुटंबपद्धतीमुळे गोष्ट सांगायला प्रत्येक घरात आजी असतेच असे नाही. त्यामुळे पुढील पिढीला या गोष्टी किंवा कहाणी याबाबत काहीच माहिती नसते.

लहानपणी गोष्ट ऐकण्याची हक्काची जागा म्हणजे आजी… तसेच श्रावण महिना सुरू झाली की, आजी आजची कहाणी सांग असे मुले हट्ट करायची. त्यानंतर आजी चातुर्मासाचे पुस्तक काढून त्यातून त्या वाराची कहाणी सांगायची. अनेकदा सांगून आजीच्या या कहाण्या तोंडपाठ असायच्या. या कहाण्या ऐकून मुलांच्या उत्सुकता आणि उत्कंठा वाढत असे. पुढे काय..पुढे काय.. असे मुले विचारायची. या कहाण्या रंगवून सांगण्याची हातोटी आजीकडे होती.

आजच्या संगणक युगात मुले मोबाईलच्या गोष्टी ऐकतात आणि अलेक्साला आदेश देतात. आजच्या काळाची ही गरज असली तरी आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असणाऱ्या या कहाण्यांचे महत्त्व जाणून घेत पुढील पिढीपर्यंत हा अनमोल वारसा पोहचवण्याची गरज आहे. आटपाट नगर, दवंडी पिटणारा राजा, प्रजा आणि भक्तीभावाने व्रतवैकल्ये करणारी प्रजा हे सर्व आता इतिहासजमा झाले आहे. मग पुढील पिढीपर्यंत या कहाण्या कशाला पोहचवायच्या, असा सवालही होत असतो.

आपल्या संस्कृतीत अनेक गोष्टी या प्रतिकात्मक रुपाने सांगत पुढील पिढीवर चांगले संस्कार करण्यात येत होते. त्यामुळे त्यांना वेगळे नीतीशास्त्र किंवा समाजात कसे वागावे, हे शिकवण्याची गरज नव्हती. या रोटक गोष्टींमुळे काय योग्य, काय अयोग्य याचा निर्णय करत मुले चांगले गुण आत्मसात करत होती. त्यामुळे या कहाण्यांमधून पुढील पिढाला बोध मिळत होता. तसेच पुर्वीच्या काळी महिला या चुलीजवळच असायच्या. श्रावण महिन्यातील व्रतवैकल्यांमुळे त्यांना घराबाहेर पडण्याची संधी मिळत असे. तसेच एकमेंकींना भेटण्याचा आनंदही मिळत होता.

या कहाण्या आज कालबाह्य झाल्या आहेत, असे म्हणण्याऐवजी प्रत्येक गोष्टीतून काय बोध किंवा काय शिकवण दिली आहे, याची माहिती आपण स्वतः करून घेत मुलांना या रोचक गोष्टींची माहिती द्यावी. तसेच त्या काळात या कहाण्यांचा काय उद्देश असावा, त्यातून काय शिकवण मिळते, याबाबत मुलांनाही ज्ञान देत त्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. त्यातून आपल्या संस्कृतीची आपल्याला खरी ओळख होईल आणि अनमोल वारसा त्यातील बोध आणि शिकवणीसह पुढील पिढीपर्यंत पोहचण्यास मदत होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

घरात ढेकूण झाले तर काय करावे? हे करून पहा घरात ढेकूण झाले तर काय करावे? हे करून पहा
घरात ढेपूण झाले तर काही सोपे घरगुती उपाय आहेत. सर्वात आधी चादरी, उशाचे कव्हर, पडद्यासह अन्य कपडे गरम पाण्याने धुवा....
मंत्रालयात सिलिंग कोसळले
वाहनांच्या काचेला क्रॅश पडला तर… काय करायचं?
महाराष्ट्रात माय मराठीची गळचेपी सुरूच, ‘हिंदी’साठी मराठी चित्रपटाला स्क्रीन नाकारली
माघी उत्सवातील बाप्पांचे 2 ऑगस्टला विसर्जन! सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर विघ्न दूर
विद्यापीठाच्या जागेवरील एसआरएला स्थगिती
साक्षीदार फोडण्यासाठी गुन्हेगारांना वेळ मिळावा म्हणून खटले मुद्दाम लांबवले जात आहेत, हाच ‘गेम प्लान’ बनलाय! सर्वोच्च न्यायालयाला चिंता