शहा सेनेचे आमदार गायकवाड यांच्या निलंबनाची मागणी, लुंगी-बनियनवर कॅण्टीन कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण; आमदार निवासातील कॅण्टीनचा परवाना एफडीएकडून रद्द

शहा सेनेचे आमदार गायकवाड यांच्या निलंबनाची मागणी, लुंगी-बनियनवर कॅण्टीन कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण; आमदार निवासातील कॅण्टीनचा परवाना एफडीएकडून रद्द

शहा सेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची मुजोरी आज महाराष्ट्राने पाहिली. गायकवाड यांनी लुंगी–बनियनवर आमदार निवासाच्या कॅण्टीनमध्ये राडा केला. शिळे जेवण दिल्याची तक्रार करत त्यांनी कॅण्टीन कर्मचाऱ्याला अमानुषपणे मारहाण केली. दरम्यान, या घटनेची तीव्र पडसाद आज विधिमंडळात उमटले. गुंडगिरी करणाऱ्या मुजोर आमदाराला निलंबित करा, अशी जोरदार मागणी विरोधकांनी सभागृहात केली. रात्री उशिरा एफडीएने कॅण्टीनचा परवाना रद्द केला.

मुंबई येथील आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅण्टीनमध्ये मंगळवारी रात्री हा प्रकार घडला.  संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली होती. त्यांना ऑर्डरप्रमाणे त्यांच्या खोलीत जेवणही पाङ्गवण्यात आले. मात्र जेवणातील डाळ आणि भात शिळा होता आणि त्याला वास येत होता, अशी तक्रार करत गायकवाड लुंगी बनियनवरच थेट कॅण्टीनमध्ये जात धिंगाणा घातला. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गायकवाड यांच्या गुंडगिरीचा सर्वत्र निषेध होत आहे.

या मुजोर आमदाराची मस्ती याच अधिवेशनात उतरवा

अशा मस्तीखोर, मुजोर आमदाराची मस्ती याच अधिवेशनात उतरवणे गरजेचे आहे. गायकवाड यांनी ज्याप्रकारे बुक्केबाजी करत मारहाण केली आहे, भ्रष्टनाथ मिंधे यावर काही बोलणार आहेत का? ते शांत राहणार आहेत का? असे सवाल शिवसेना नेते आदित्य ङ्खाकरे यांनी केले.

गुंडागर्दी करणाऱ्या गायकवाड यांच्यावर कारवाई करा

महापुरुषांचा अवमान करणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे असे प्रताप गायकवाड नेहमीच करत असतात. अशा गुंड प्रवृत्तीच्या आमदाराला पक्ष तरी कसा पाठीशी घालतो, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

अध्यक्षांनी दखल घेऊन योग्य कारवाई करावी 

निकृष्ट दर्जाचे जेवण मिळाले तर तक्रार करता येते, परंतु अशी मारहाण योग्य नाही. सभापती व विधानसभा अध्यक्षांनी याची दखल घेऊन योग्य कारवाई करावी, अशी शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापती राम शिंदे यांच्याकडे केली.

आमदार गायकवाडांना बडतर्फ करा

निकृष्ट दर्जाचे जेवण दिले म्हणून हा आमदार दादागिरी करत आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राला हे शोभत नाही. यांचा बंदोबस्त करा, त्यांना निलंबित करा, बडतर्फ करा अशी मागणी आमदार परब यांनी केली. आमदारांनी कसे राहावे याचे काही संकेत आहेत की नाही? हे गल्लीतील लोक आहेत का? सरकारच्या प्रतिमेला यामुळे बट्टा लागतो आहे. अशा लोकांचा तुम्ही पाठिंबा घेणार का? अशा लोकांच्या पाठिंब्यावर सरकार चालवणार का? असा प्रश्नांचा भडिमार त्यांनी केला. आमदार निवास विधिमंडळाच्या कार्यकक्षेत येते. विधिमंडळात मी कुणाला मारहाण केली तर तुम्ही निलंबित कराल. त्यामुळे या आमदाराचे निलंबन करून असे प्रकार खपवून घेणार नाही असे संदेश जनतेला द्या, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

घरात ढेकूण झाले तर काय करावे? हे करून पहा घरात ढेकूण झाले तर काय करावे? हे करून पहा
घरात ढेपूण झाले तर काही सोपे घरगुती उपाय आहेत. सर्वात आधी चादरी, उशाचे कव्हर, पडद्यासह अन्य कपडे गरम पाण्याने धुवा....
मंत्रालयात सिलिंग कोसळले
वाहनांच्या काचेला क्रॅश पडला तर… काय करायचं?
महाराष्ट्रात माय मराठीची गळचेपी सुरूच, ‘हिंदी’साठी मराठी चित्रपटाला स्क्रीन नाकारली
माघी उत्सवातील बाप्पांचे 2 ऑगस्टला विसर्जन! सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर विघ्न दूर
विद्यापीठाच्या जागेवरील एसआरएला स्थगिती
साक्षीदार फोडण्यासाठी गुन्हेगारांना वेळ मिळावा म्हणून खटले मुद्दाम लांबवले जात आहेत, हाच ‘गेम प्लान’ बनलाय! सर्वोच्च न्यायालयाला चिंता