हडपसरमधील उघड्यावरील कचरा प्रकल्प रात्रीत गायब; ठेकेदाराला वाचविण्यासाठी घनकचरा विभागाचा आटापिटा

हडपसरमधील उघड्यावरील कचरा प्रकल्प रात्रीत गायब; ठेकेदाराला वाचविण्यासाठी घनकचरा विभागाचा आटापिटा

हडपसर येथील कचरा संकलन केंद्राला (रॅम्प) महापालिका आयुक्त भेट देणार असल्याचे समजताच, घनकचरा विभागाकडून लाडक्या ठेकेदाराला वाचवण्यासाठी एका रात्रीत हा प्रकल्पच गायब केला. आयुक्तांच्या निदर्शनास उघड्यावर घाण दिसू नये, यासाठी आटापिटा केला. मात्र, हडपसर रॅम्प येथील घनकचऱ्याच्या मनमानी कारभाराची दखल घेत, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पुढील सहा महिन्यांत रॅम्पचा चेहरामोहरा बदलण्याचे जाहीर केले.

महापालिका आयुक्तांनी कचरा रॅम्प आणि प्रकल्पांना भेट देण्यास सुरुवात केल्यानंतर घनकचरा विभागाचा भोंगळ आणि ठेकेदारी कारभार समोर येऊ लागला आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका आयुक्तांकडून सद्यपरिस्थितीची पाहणी करून नवनवीन योजना राबवण्यास सुरुवात करत आहेत. मात्र, केवळ मर्जीतल्या ठेकेदारांना ठेके मिळवून देणे, एवढेच उद्दिष्ट ठेवणाऱ्या घनकचरा विभागाचे नवीन आयुक्तांपुढे पितळ उघडे पडू लागले आहे. शहरात गोळा होणाऱ्या कचऱ्यापैकी तब्बल एक तृतयांश कचरा हडपसर रॅम्पवर येतो. पालिकेकडे जागा कमी असल्याने हडपसर येथील पुणे कॅण्टोन्मेंट बोर्डाच्या जागेमध्ये रॅम्प उभारला आहे. येथील कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारींमुळे घनकचरा विभागाने औषध फवारणी व संबंधित उपाययोजना करण्यासाठी निविदा काढली. भूमी ग्रीन या कंपनीची 49 कोटी रुपयांची निविदा आली. मात्र, खर्च अवाच्या सवा असल्याने ही निविदा रद्द केली. मात्र, हडपसर येथील कंपोस्ट आणि आरडीएफ तयार करण्याचा प्रकल्प रॅम्प बाहेर बंदिस्त असून, हे काम भूमी ग्रीन एनर्जी या कंपनीकडून चालविले जाते. तर, परिसरातच भूमी ग्रीन एनर्जीकडून जागेवर सायंटिफिक लैंड फिलिंगचे काम सुरू असून, खड्यांमध्ये कचरा जिरवण्याचे काम सुरू असल्याने अर्धा भाग खुलाच आहे. तर, याच परिसरात रॅम्पलगत ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी ट्रॉमल मशीन बसवून येथून दररोज सुमारे १५० टन सुका कचरा सिमेंट कंपन्यांना पुरविला जातो. आदर्श एनव्हायरो प्रा. लि. या कंपनीचा हा प्रकल्प उघड्यावरच असून, गेल्या वर्षभरापासून उघड्यावर कारभार सुरू आहे. मिश्र कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरते. उघड्यावर कचऱ्याची परिस्थिती दैनिक ‘सामना’ने समोर आणली. या संदर्भातील वृत्ताची दखल घेत, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शनिवारी हडपसर रॅम्पला भेट देण्याचे ठरवले. शनिवारी सकाळी भेटीपूर्वी रॅम्पच्या आवारातील कचरा विलगीकरण प्रकल्प गुंडाळण्यात आल्याचे निदर्शनास आले.

सहा महिन्यांत रॅम्पचे चित्र बदलू – आयुक्त राम

हडपसर रॅम्पवर पुरेशी जागा असताना, योग्य नियोजन झालेले नाही. हडपसर रॅम्पच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेऊन सहा महिन्यांत या रॅम्पचा मेकओव्हर करू तसेच या परिसरात कॅण्टोन्मेंट बोर्डचा कचरा डेपो असून, तेथील वर्षानुवर्षे कचरा पडून आहे. याबाबत कॅण्टोन्मेंट बोर्डच्या अधिकाऱ्यांसोबत सोमवारी बैठक बोलावली असून, यावरही तोडगा काढला जाईल, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नमूद केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आधी विश्वास संपादन केला, मग घरी बोलावत पायलटकडून एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार आधी विश्वास संपादन केला, मग घरी बोलावत पायलटकडून एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार
एका खासगी विमान कंपनीत काम करणाऱ्या पायलटनेच सहकारी एअर होस्टेसवर बलात्कार केल्याची घटना मीरा रोडमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी नवघर...
जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवारमध्ये चकमक; सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना घेरले
मुख्यमंत्र्यांनी कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि पार्टी विथ डिफरन्स हे सिद्ध करावे; कैलास पाटील यांचे आव्हान
इंडोनेशियात भर समुद्रात प्रवासी जहाजाला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या समुद्रात उड्या
Ratnagiri News – दापोली मंडणगड मार्गावर खड्डयांचे साम्राज्य, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
हा महामार्ग आहे की भात लावणीचा चिखल? मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्याची दुर्दशा
देवेंद्र दरबारी.. मंत्री रम्मी खेळती भारी! अमोल कोल्हे यांचा निशाणा