पाच बांगलादेशी महिलांना पकडले, बुधवार पेठेत कारवाई; छुप्या पद्धतीने देशात प्रवेश

पाच बांगलादेशी महिलांना पकडले, बुधवार पेठेत कारवाई; छुप्या पद्धतीने देशात प्रवेश

शहरातील रेड लाईट परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुधवार पेठेतील मालाबाई वाड्यावर फरासखाना पोलिसांनी कारवाई करत अवैधरीत्या देशात वास्तव्यास असलेल्या पाच बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. त्यांनी देशात येताना पश्चिम बंगाल येथील नागरिक असल्याचा बनाव केल्याचेही चौकशीत पुढे आले आहे.

जहानारा मजिद शेख (वय 45, रा. मूळ जैशोर, खुलना), शिल्पी बेगम रबिउल्ला शेख (वय 28, मूळ रा. ढाका), नुसरात जहान निपा (वय 28, रा. मूळ, नारायणगंज), आशा खानाम इयर अली (वय 30, रा. मूळ, नोडाई, कालिया), शिल्पी खालेकमिया अक्तर (वय 28, रा. रायपुरा, बांगलादेश) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. या महिलांनी बांगलादेशातून छुप्या मार्गाने सीमा ओलांडून देशात प्रवेश केला. तसेच, पुण्यात त्या वेश्याव्यवसाय करत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यांच्यावर विविध कलमान्वये फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्तीवर होते. त्यादरम्यान शुक्रवारी (दि.18) दोन पथकांनी बुधवार पेठेत अचानक छापा टाकला. यावेळी या महिला बांगलादेशातून बेकायदेशीर मार्गाने देशात दाखल झाल्याचे आणि वेश्याव्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले. अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, अंमलदार मेहबूब मोकाशी, मनीषा पुकाळे, गजानन सोनुने, नितीन तेलंगे, तानाजी नांगरे, महेश राठोड, राजश्री मोहिते, राणी शिंदे, अनिता करदास, अंजली भोईटे, मनीषा कवठे, इफ्तेसाम शेख यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;