जन्मदात्याला मुलाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण; उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू

जन्मदात्याला मुलाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण; उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू

‘तुम्ही वारंवार बहिणीकडे राहायला का जाता?’ हा राग मनात धरून जन्मदात्या बापाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान पित्याचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर नाथा खंडागळे (वय – 55, रा. मांजरवाडी, ता. जुन्नर) असे मृत्यू झालेल्या पित्याचे नाव आहे, तर गणेश ज्ञानेश्वर खंडागळे (वय – 38) असे मुलाचे नाव असून त्याला पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी माहिती दिली. मांजरवाडी येथे ज्ञानेश्वर नाथा खंडागळे यांच्या गणेश खंडागळे या माथेफिरू मुलाने दोन दिवसांपूर्वी (दि. 16) वडिलांना ‘तुम्ही बहिणीकडे का जाता’ या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी केली. तो एवढ्यावरच थांबला नाही, त्याने वडिलांना खाली पाडून छातीवर व पोटावर आणि डोक्यावर केले. जोरजोरात लाथा मारून गंभीर जखमी केले

बाजूच्या एका व्यक्तीने याबाबतची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनला फोनवरून दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ज्ञानेश्वर खंडागळे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने पोलिसांनी नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलीस शिपाई आनंदा चौगुले यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली.

दरम्यान, ज्ञानेश्वर नाथा खंडागळे यांचा उपचारादरम्यान गुरुवारी (दि. १७) मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या माथेफिरू मुलास पोलिसांनी तत्काळ अटक केली असून याबाबतचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार करीत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;