आयुष्य खरोखरच पूर्ण झालं…, लॉर्ड्सवर तैलचित्र पाहताच सचिन तेंडुलकर भावुक

आयुष्य खरोखरच पूर्ण झालं…, लॉर्ड्सवर तैलचित्र पाहताच सचिन तेंडुलकर भावुक

ऍण्डरसन-तेंडुलकर करंडकाचा थरार सध्या इंग्लंडमध्ये सुरू आहे. पहिला सामना इंग्लंडने आणि दुसरा सामना टीम इंडियाने जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. आता तिसरा सामना गुरुवार (10 जुलै 2025) पासून लॉर्ड्सवर सुरू झाला आहे. मात्र, या सामन्यापूर्वी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा विशेष सन्मान करण्यात आला. क्रिकेटची पंढरी म्हणून लॉर्ड्सचा जगभरात सन्मान केला जातो. याच लॉर्ड्स स्टेडियमच्या संग्रहालयामध्ये सचिन तेंडुलकरच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले आहे. त्यामुळे भावुक झालेल्या सचिनने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी लॉर्ड्सवर सचिन तेंडुलकरच्या तैलचित्राचे अनावर करण्यात आले. त्याचबरोबर सामन्याची सुरुवात सुद्धा सचिन तेंडुलकरने घंटा वाजवून केली. या विशेष सन्मानामुळे सचिन तेंडुलकर भावुक झाला असून त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला की, “मी 1988 मध्ये किशोरवयीन असताना पहिल्यांदा लॉर्ड्सला भेट दिली आणि 1989 मध्ये स्टार क्रिकेट क्लब संघासह परतलो. मला आठवतं की मी पॅव्हेलियनजवळ उभा राहून इतिहासात रमलो होतो आणि शांतपणे स्वप्ने पाहत होतो. परंतु आज याच ठिकाणी माझ्या पोर्ट्रेटचे अनावरण झालं, ही एक अशी भावना आहे जी शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. आयुष्य खरोखरच पूर्ण झालंं आहे. मी कृतज्ञ आहे.” असं म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

IPL 2025 दरम्यान तिकिटांचा काळाबाजार; हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना अटक, SRH शी कनेक्शन

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

घरात ढेकूण झाले तर काय करावे? हे करून पहा घरात ढेकूण झाले तर काय करावे? हे करून पहा
घरात ढेपूण झाले तर काही सोपे घरगुती उपाय आहेत. सर्वात आधी चादरी, उशाचे कव्हर, पडद्यासह अन्य कपडे गरम पाण्याने धुवा....
मंत्रालयात सिलिंग कोसळले
वाहनांच्या काचेला क्रॅश पडला तर… काय करायचं?
महाराष्ट्रात माय मराठीची गळचेपी सुरूच, ‘हिंदी’साठी मराठी चित्रपटाला स्क्रीन नाकारली
माघी उत्सवातील बाप्पांचे 2 ऑगस्टला विसर्जन! सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर विघ्न दूर
विद्यापीठाच्या जागेवरील एसआरएला स्थगिती
साक्षीदार फोडण्यासाठी गुन्हेगारांना वेळ मिळावा म्हणून खटले मुद्दाम लांबवले जात आहेत, हाच ‘गेम प्लान’ बनलाय! सर्वोच्च न्यायालयाला चिंता