आयर्विन पुलाची पाणीपातळी 19 फुटांकडे

आयर्विन पुलाची पाणीपातळी 19 फुटांकडे

चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठय़ात झपाट्याने वाढ होत आहे. चांदोली धरणाचा पाणीसाठा 29.03 टीएमसी झाला असून, सलग दुसऱ्या दिवशी 4500 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणीपातळी 19 फुटांकडे वाटचाल करू लागली आहे.

दरम्यान, आज जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती, तर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. चांदोली धरण क्षेत्रात चोवीस तासात 64 मि.मी. पाऊस झाला. धरणात सायंकाळी 29.03 टीएमसी पाणीसाठा असून, या धरणाची साठवण क्षमता 34.40 टीएमसी इतकी आहे. चांदोली धरणाचे चारही दरवाजे उघडले असून 4500 क्युसेक विसर्ग सुरू आहे. कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. धरणात 69.05 टीएमसी पाणीसाठा झाला असून, 1050 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. दोन्ही धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणीपातळी 19 फुटांकडे वाटचाल करू लागली आहे.  कर्नाटकातील अलमट्टी धरणाचा पाणीसाठा 88.25 टीएमसी झाला आहे. धरणात पाण्याची आवक 1 लाख 10 हजार क्युसेकने होत असून 1 लाख 11 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 5 मि.मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 27.6 मि.मी. पाऊस झाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;