जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरची अटल सेतूवरून समुद्रात उडी; युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू

जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरची अटल सेतूवरून समुद्रात उडी; युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू

जे. जे. इस्पितळात कार्यरत असलेल्या एका अविवाहित डॉक्टरने अटल सेतूवरून समुद्रात उडी घेतली आहे. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. बेपत्ता डॉक्टरांचे नाव ओंकार भागवत कवितके (32) असून उलवे पोलिसांकडून समुद्र परिसरात मागील 36 तासांपासून कसून शोध घेतला जात आहे.

वाहतुकीसाठी खुला केल्यापासून आतापर्यंत अटल सेतूवर तीन डॉक्टर, बॅक मॅनेजर, अभियंता अशा उच्च शिक्षितांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. अविवाहित असलेले डॉक्टर ओंकार भागवत कवितके हे कळंबोली-पनवेल येथील सेक्टर -20 मधील अविनाश सोसायटी, प्लॉट नंबर 67 मध्ये राहत होते. ते मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. सोमवारी (7) रात्री 9.30 वाजताच्या सुमारास डॉक्टर ओंकार यांनी चारचाकी थांबवून अटल सेतूवरून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरून थेट खवळलेल्या समुद्रात उडी घेतली.

मुंबई-गोवा महामार्गावर जानवलीजवळ ट्रक बँरिकेट्सवर धडकला; चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

अटल सेतू पोलीस कंट्रोल रूममधुन सोमवारी (7) रात्री 9.45 घटनेची माहिती मिळताच न्हावा-शेवा बंदर विभागाच्या अखत्यारीत असलेल्या उलवे पोलिसांनी पथकासह घटना स्थळी धाव घेतली. घटनास्थळी होंडा कंपनीची चारचाकी कार आणि व आयफोन आढळून आला. त्यावरून डॉक्टरांच्या कुटुंबियांची माहिती मिळली. कळंबोलीत वास्तव्यास असलेल्या बहीण कोमल लंबाते यांना पोलीस ठाण्यात बोलावून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

कोर्लईच्या समुद्रात पाकिस्तानी बोटीच्या चर्चेने दिवसभर खळबळ

बेपत्ता डॉक्टराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी रेस्क्यू टीम, तसेच सागरी सुरक्षा विभागाच्या ध्रुवतारा बोटीची मदत घेतली आहे. मात्र, अद्यापही बेपत्ता डॉक्टरांचा शोध लागलेला नाही. दरम्यान, बेपत्ता डॉक्टरांबाबत कोणास काही माहिती मिळवून आल्यास तात्काळ उलवा पोलीस ठाण्याशी 02220870670 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उलवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाणी यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आरोही, वैष्णवी, आराध्या, अवनी, शिप्रा, स्वरा यांची आगेकूच आरोही, वैष्णवी, आराध्या, अवनी, शिप्रा, स्वरा यांची आगेकूच
आरोही मोरे, वैष्णवी मांगलेकर, आराध्या ढेरे, अवनी शेट्टी, शिप्रा कदम, स्वरा मोरे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून योनेक्स सनराईज...
गोरांक्ष, नैतिक, वेदांत, शाश्वत विजेते
Kalyan News – मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक
लहान मुलांना ‘हे’ 5 पदार्थ चुकूनही देऊ नका खायला, चवीच्या नादात आरोग्याचे होईल मोठे नुकसान
तुम्हीही गरजेपेक्षा जास्त बदाम खाता का? तर ‘या’ 5 मोठ्या समस्यांचा करा लागेल सामना
Thane News – कसारा स्थानकाजवळ दरड कोसळली, लोकल थोडक्यात बचावली; दोन प्रवासी गंभीर जखमी
Pune News – पत्नीचे अश्लील व्हिडिओ बनवत व्हायरल करण्याची धमकी; पैशासाठी क्लास वन अधिकाऱ्याचं संतापजनक कृत्य