देवाभाऊंच्या राज्यात सावकारी पाश; भाजप पदाधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याने जीवन संपवले

देवाभाऊंच्या राज्यात सावकारी पाश; भाजप पदाधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याने जीवन संपवले

भाजप पदाधिकारी डॉ. लक्ष्मण जाधव व त्याची पत्नी यांच्या सावकारकीतून झालेल्या त्रासाला कंटाळून 42 वर्षीय कपडा व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

राम दिलीप फटाले (42, रा. काळा हनुमान ठाणा, बीड) असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. राम फटाले हे कपडय़ाचा व्यापार करत होते. आठवडी बाजारात ते दुकान लावून कपडे विक्री करायचे. कपडा व्यवसायासाठी त्यांनी डॉ. लक्ष्मण जाधव या सावकाराकडून कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम व्याजासह देऊनदेखील जाधव पती-पत्नीकडून मानसिक त्रास देत शिवीगाळ केली जात होती. सावकाराने फटाले यांच्याकडून चेक घेतला होता. पैसे परत देऊनही आणखी पैशाची मागणी करत चेक परत देण्यास नकार दिला जात होता. याबरोबरच त्यांनी काही पतसंस्थांकडूनदेखील कर्ज घेतलेले होते. कोरोनानंतर कपडा विक्रीत घट झाली. धंदा बसला, खर्च वाढला. त्यामुळे व्याजही वाढत गेले, जानेवारी महिन्यात सावकाराच्या रकमेची परतफेडदेखील केली. शनिवारी रात्री फोनवरून सावकाराने शिवीगाळ केली. रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास राम फटाले यांची पत्नी सुलभा झोपेतून उठली. तोपर्यंत राम फटाले पंख्याला दोरी बांधून लटकल्याचे दिसले.

सात पानी चिठ्ठी

मृत्यूपूर्वी राम फटाले यांनी सावकार डॉ. लक्ष्मण जाधव व त्याची पत्नी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची सात पानी चिठ्ठी लिहून ठेवली. डॉ. लक्ष्मण जाधव हा भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचा जिल्हाध्यक्ष आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास चव्हाण करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लहान मुलांना ‘हे’ 5 पदार्थ चुकूनही देऊ नका खायला, चवीच्या नादात आरोग्याचे होईल मोठे नुकसान लहान मुलांना ‘हे’ 5 पदार्थ चुकूनही देऊ नका खायला, चवीच्या नादात आरोग्याचे होईल मोठे नुकसान
आजकाल मुलांच्या आहारात प्रक्रिया केलेले आणि अनहेल्दी पदार्थांचे सेवन अधिकच वाढत चालेले आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुलं फास्ट फुड देखील...
तुम्हीही गरजेपेक्षा जास्त बदाम खाता का? तर ‘या’ 5 मोठ्या समस्यांचा करा लागेल सामना
Thane News – कसारा स्थानकाजवळ दरड कोसळली, लोकल थोडक्यात बचावली; दोन प्रवासी गंभीर जखमी
Pune News – पत्नीचे अश्लील व्हिडिओ बनवत व्हायरल करण्याची धमकी; पैशासाठी क्लास वन अधिकाऱ्याचं संतापजनक कृत्य
बिहारमध्ये मतांची चोरी? 51 लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणार, निवडणूक आयोगाने दिली मोठी अपडेट
Vasai News – वसईतील समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद कंटेनर, पोलिसांकडून तपास सुरू
Amarnath Yatra Bus Accident – जम्मू-श्रीनगर महामार्गावर अमरनाथ यात्रेकरूंच्या बसला अपघात; 4 जण जखमी