‘अल्प इंजिनिअरिंग’च्या कर्मचाऱ्यांना तब्बल १३ हजारांची पगारवाढ; चाकण औद्योगीक क्षेत्रातील सर्वाधिक वेतनवाढ!

स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना-कंपनी व्यवस्थापनात करार

‘अल्प इंजिनिअरिंग’च्या कर्मचाऱ्यांना तब्बल १३ हजारांची पगारवाढ; चाकण औद्योगीक क्षेत्रातील सर्वाधिक वेतनवाढ!

स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना आणि अल्प इंजिनिअरिंग प्रा. लि. कंपनीमध्ये चाकण औद्योगिक पट्टयातील सर्वाधिक वेतनवाढ करार करण्यात आला. अल्प इंजिनिअरिंगच्या कर्मचाऱ्यांना तब्बल १२ हजार ८०० रुपयांची पगारवाढ देण्यात आली. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पिंपरी: स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना आणि अल्प इंजिनिअरिंग प्रा. लि. कंपनीमध्ये चाकण औद्योगिक पट्टयातील सर्वाधिक वेतनवाढ करार करण्यात आला. अल्प इंजिनिअरिंगच्या कर्मचाऱ्यांना तब्बल १२ हजार ८०० रुपयांची पगारवाढ देण्यात आली. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

चाकण औद्योगिक वसाहातीमधील निघोजे चाकण येथील अल्फ इंजिनीअरिंग प्रा. लि. व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये तिसरा वेतनवाढ करार झाला. यावेळी संघटनेचे प्रमुख सल्लागार  आमदार महेश लांडगे, प्रमुख सल्लागार रोहिदास गाडे पाटील, संघटनेचे  अध्यक्ष जीवन येळवंडे, कंपनीचे डायरेक्टर पियर डिसूजा, प्लॅन्ट हेड विनोद टिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पूर्णत्वास आला  आहे.

करारावरती संघटनेच्या वतीने सरचिटणीस कृष्णा रोहोकले, उद्योजक राजु बोत्रे, चिटणीस रघुनाथ मोरे, खजिनदार अमृत चौधरी, दत्तात्रय गवारी, प्रशांत पाडेकर, रविंद्र भालेराव, सोमनाथ जानराव, गृपो कंपनीचे युनिट अध्यक्ष संजय पाटील, युनिट अध्यक्ष किशोर गोरखा, उपाध्यक्ष योगेश गाढवे, सरचिटणीस महेंद्र लाड, चिटणीस सुदाम गुळवे, खजिनदार राजेश सिंग, संघटक गणेश पवार, योगेश व्यवहारे,, एच. आर. मॅनेजर गंगाधर लहाने यांनी स्वाक्षरी केल्या आहेत. कामगारानी डीजेच्या तालावर नाचून, पेढे वाटून फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्येक्त केला.

करारामध्ये झालेले ठळक मुद्दे खलीलप्रमाणे..

एकूण पगारवाढ :- १२, ८०१/- ( बारा हजार आठशे एक रुपये), कराराचा कालावधी ०१/१२/२०२२ ते ३०/११/२०२५ या तीन वर्षांचा राहील. मेडिक्लेम पॉलीसी:-  कुटुंबासाठी ३०००००/- रुपयांची पॉलिसी राहणार असून संपूर्ण खर्च कंपनी करणार या पॉलिसी मध्ये स्वतः, पत्नी, मुले यांचा समावेश करण्यात येणार आहे. मृत्यू साहाय्य योजना, ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी, सुट्टया, दिवाळी बोनस, वैयक्तिक कर्ज सुविधा, गुणवंत कामगार पुरस्कार:- प्रत्येक वर्षी एक गुणवंत कामगारांची निवड करून त्यांना प्रत्येकी १००००/- ( दहा हजार) रुपये एवढी रक्कम प्रशस्तीपत्र व ट्रॉफी बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे. कॅन्टीन आणि बस सुविधा अशा कामगार हिताच्या मुद्यांचा करारामध्ये समावेश आहे.WhatsApp Image 2024-03-23 at 10.43.19

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;