ज्येष्ठांमध्ये डिमेन्शिया आजार बळावण्याचा धोका वाढला! आजार नियंत्रित ठेवण्यासाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे योग्य व्यवस्थापन आवश्यक
एकलकोंडेपणा, मोबाईल, टीव्हीसारख्या माध्यमांवर तासन्तास वेळ घालणे, शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे सध्या ज्येष्ठांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘डिमेन्शिया’ आजाराचा धोका वाढत आहे.
पूर्वी 60 ते 65 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा आजार दिसून येत होता; मात्र अलीकडे 50 वर्षांच्या ज्येष्ठांमध्ये हा आजार उद्भवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ज्येष्ठांमधील हा आजार नियंत्रित ठेवण्यासाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
डिमेन्शिया हा प्रामुख्याने उतारवयात आढळून येणारा आजार आहे. पूर्वी साठी नंतरच्या ज्येष्ठांमध्ये काही प्रमाणात हा आजार आढळून येत होता. मात्र, सध्या पन्नाशीतल्या ज्येष्ठांमध्ये हा आजार बळावण्याचे प्रमाण वाढले आहे. लक्षणे दिसून आल्यास मेंदूचा एमआरआय, सीटी स्कॅन करणे, नियमित व्यायाम, पुरेशी झोप याचा अवलंब केल्यास नियंत्रण मिळवता येते, असेही तज्ज्ञांनी सांगितले.
ज्येष्ठांमध्ये डिमेन्शिया आजार बळावण्याचे प्रमाण वाढले आहे. एकलकोंडेपणा, ताणतणाव, व्यायाम, सकस आहाराचा अभाव यासारख्या गोष्टी या आजाराला कारणीभूत ठरत आहेत. हा आजार नियंत्रित ठेवण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
– डॉ. राजेश अलोणे, मानसोपचार तज्ज्ञ
- डिमेन्शियाची लक्षणे
विचार करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे.
भाषा आणि संवाद साधण्यात अडचणी येणे.
वर्तणुकीत बदल होणे.
नैराश्य, चिडचिड वाढणे. - या गोष्टींचा अवलंब करावा
नियमित व्यायाम.
संतुलित आहार.
सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवणे.
नवीन गोष्टी शिकणे.
ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List