महाराज भाऊिंसहजी यांचे दुर्मिळ सात खंड उपलब्ध; छत्रपती शाहू महाराजांचे छायाचित्र व माहितीला उजाळा

महाराज भाऊिंसहजी यांचे दुर्मिळ सात खंड उपलब्ध; छत्रपती शाहू महाराजांचे छायाचित्र व माहितीला उजाळा

रयतेचा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची अनेक दुर्मिळ छायाचित्रे आणि माहिती असणार्‍या पुस्तकांचे सात खंड उपलब्ध झाले आहेत. सन १९११ मध्ये प्रकाशित झालेले हे खंड अत्यंत दुर्मिळ असून, १०० वर्षांहून अधिक काळ हे खंड फारसे वापरले नसले तरी सुस्थितीत आहेत. या सर्व प्रती सह्याद्री इतिहास संशोधन केंद्रात उपलब्ध असून, त्यांचे डिजिटलायझेशन करून ते येथील संग्रहालयात ठेवण्याची प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची उद्या (दि. २६) १५१वी जयंती साजरी होत असतानाच हे महत्त्वपूर्ण संशोधन समोर आले आहे. यावेळी हर्षल सुर्वे, किरणिंसह चव्हाण, अमित अडसुळे, ओंकार कोळेकर, दिगंबर भोसले, सागर पाटील, सर्जेराव कांबळे, शुभम शिरहटी, आकाश भोसले आदी उपस्थित होते.

गुजरातमधील भावनगरचे भाऊिंसहजी महाराज हे छत्रपती शाहू महाराजांचे परममित्र, जीवाभावाचे स्नेही होते. राजकोट अध्यासन काळापासूनचे ते सहाध्यायी. पुढे छत्रपती शाहूंनी त्यांचे कायम स्मरण व्हावे म्हणून कोल्हापुरातील जुना राजवाडा ते नवीन राजवाडा या राजमार्गाला ‘भाऊिंसहजी रोड’ असे नाव दिले. तर भाऊिंसहजी यांनीही महुआ येथे बांधलेल्या राजवाड्यास शाहू पॅलेस असे नाव दिले. सन १८९६ला भावनगरच्या गादीवर आलेल्या भाऊिंसहजींनी कर्तव्यनिष्ठेने राज्य चालवले. ते पुरोगामी राज्यकर्ते होते.

भाऊिंसहजी महाराजांनी राजकोट येथील राजकुमार कॉलेजवर ‘फोर्टी इयर्स ऑफ द राजकुमार कॉलेज’ हा सात खंडात्मक ग्रंथ लिहिला. या सातही खंडांचे प्रकाशन सन १९११मध्ये झाले. यातून भाऊिंसहजी महाराजांची कॉलेजबद्दलची आस्था दिसते. सन १८७० सालापासूनचा या कॉलेजचा प्रवास यामध्ये दिलेला आहे. छत्रपती शाहू महाराजांचे दत्तक वडील छत्रपती शिवाजी महाराज चौथे यांचे शिक्षणही येथेच झाले होते. त्यांचेही अनेक दुर्मिळ असे फोटो या ग्रंथात आहेत. राजकोट कॉलेजमध्ये सन १८८५ ते १८८९ पर्यंत छत्रपती शाहू महाराजांचे वास्तव्य होते. महाराजांनी येथे शिक्षणाबरोबर कवायत, तालीम, घोडेस्वारी, नेमबाजी या मर्दानी खेळासह क्रिकेट, फुटबॉल यासारख्या मैदानी खेळाचेही प्रशिक्षण घेतले. याचे फारसे छायाचित्र आजपर्यंत उपलब्ध नव्हते ते या खंडामुळे उपलब्ध झाले आहे.

सन १९११ पर्यंतचा या कॉलेजचा इतिहासच या सात खंडांतून भाऊिंसहजी महाराजांनी प्रकाशित केला होता. बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील सर्व संस्थानातील राजकुमार येथे शिक्षण घेत. सन १८७० ते १९११ या काळात येथे शिक्षण घेत असणार्‍या सर्व संस्थानातील राजकुमारांचे अनेक दुर्मिळ फोटो, त्या काळातील शिक्षण पद्धती, खेळ, गॅदिंरगचे फोटो, नकाशे यामध्ये उपलब्ध आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;