भाजप नेत्याकडून पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

भाजप नेत्याकडून पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याने वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रमोद कोंढरे यांच्याविरुद्ध फरासखाना पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी बंदोबस्तात असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महिला पोलीस अधिकाऱ्याने फरासखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोद कोंढरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. छत्रपती शिवाजी रस्त्यावरील प्रस्तावित भुयारी मार्गाच्या पाहणीसाठी नितीन गडकरी 23 जूनला पुण्यात आले होते. या कार्यक्रमापूर्वी सकाळी दहाच्या सुमारास भाजपचे आमदार हेमंत रासने कार्यकर्त्यांसोबत कसबा पेठ चौकी परिसरातील उपाहारगृहात चहा प्यायला गेले. त्यावेळी उपस्थित असलेल्या वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याशेजारी उभे असताना कोंढरे यांनी अश्लील वर्तन केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

प्रमोद कोंढरे यांच्याविरुद्ध 2015 मध्ये धमकावून वर्गणी मागितल्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 2010 आणि 2011 मध्ये कोंढरे यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. डेक्कन पोलीस ठाण्यात 2022 मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;