खामकरवाडी पाझर तलाव ‘ओव्हरफ्लो’

खामकरवाडी पाझर तलाव ‘ओव्हरफ्लो’

खामकरवाडी-अवचितवाडी दरम्यान असलेला खामकरवाडी लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे धरणाच्या उजव्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. हे पाणी तुळशी नदीपात्रात मिसळल्याने नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

गेल्या आठवडाभरापासून परिसरात पावसाची रिपरिप वाढली आहे. त्यामुळे तलाव व छोट्या-मोठ्या प्रकल्पांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पाऊसही सरासरीपेक्षा चांगला असल्याने जिल्ह्यातील प्रकल्प भरतील, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. आर्द्राच्या पावसाने दमदार एंट्री केल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे.

खामकरवाडी प्रकल्प खामकरवाडी व अवचितवाडी या दोन गावांसाठी वरदान आहे. प्रकल्प यावर्षी लवकरच कोरडा पडल्याने शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र बनला होता. पण आठवडाभर पावसाची संततधार सुरू झाल्याने कोरडा पडलेला प्रकल्प मध्यरात्री पूर्ण क्षमतेने भरला. या प्रकल्पात ११६२.७८ सहस्त्र घनमीटर इतका पाणीसाठा होतो. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरीवर्गातून मोठे समाधान व्यक्त होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;