‘प्राडा’ने केली कोल्हापुरी चप्पलची कॉपी, कारागिरांसह कोल्हापूरकर नाराज

‘प्राडा’ने केली कोल्हापुरी चप्पलची कॉपी, कारागिरांसह कोल्हापूरकर नाराज

इटली येथील मिलान शहरात झालेल्या जगप्रसिद्ध फॅशन शोमध्ये सहभागी मॉडेलनी लाखाच्या घरात किंमत असलेल्या कोल्हापुरी चप्पला घालून रॅम्प वॉक केला. या चपलेवर एका परदेशी खासगी कंपनीचे नाव होते.पण भारतासह प्रामुख्याने कोल्हापूरचा कुठेच उल्लेख न झाल्याने सोशल मीडियावर नेटकऱयांनी चांगलाच संताप व्यक्त केला. कोल्हापुरातील कारागिरांनी या आलिशान चपलेबद्दल शंका उपस्थित केली असून जीआय मानांकन असतानाही प्राडा या आंतरराष्ट्रीय कंपनीने हुबेहूब कोल्हापुरी चप्पल जागतिक व्यासपीठावर झळकवली कशी, असा सवालही उपस्थित केला जाऊ लागला आहे.

ज्या खाजगी कंपनीने आलिशान आकारात हुबेहूब कोल्हापुरी चप्पल जगासमोर आणली, त्या कंपनीने या चपलेची किंमत एक लाख 23 हजार इतकी लावली आहे. मुळात संपूर्ण हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली आणि नैसर्गिक चमडय़ापासून बनवलेली कोल्हापुरी चप्पल इतक्या महागडय़ा किमतीत आत्तापर्यंत कारागिरांकडून कधीच विकली गेली नाही. त्यामुळे मोठय़ा कंपन्यांनी केलेली ही चूक मूळ कोल्हापुरी चपलेच्या ब्रँडवर गदा येऊ शकते, अशा भावनाही कोल्हापुरातील कारागिरांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;