15 लाखांची खंडणी घेणाऱ्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

15 लाखांची खंडणी घेणाऱ्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

वैद्यकीय उपकरणे पुरवठादार आणि छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील औषध पुरवठा घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या अजिंक्य अनिल पाटील (वय 31, रा. कळंबा, ता. करवीर) याच्याकडून 20 लाखांची खंडणी मागून तडजोडीअंती 15 लाखांची खंडणी घेतल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्त्यासह दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.

माहिती अधिकार कार्यकर्ता जयराज भीमराव कोळी (वय 43, रा. हॉकी स्टेडियमजवळ, नेहरूनगर) आणि त्याचा सहवारी युवराज मारुती खराडे (वय 45, रा. उचगाव, ता. करवीर, दोघे जि. कोल्हापूर) अशी या खंडणीखोरांची नावे असून, कागलजवळील लक्ष्मी टेकडीजवळ खंडणीची रक्कम घेताना या दोघांना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली. त्यांच्याकडील वाहनांसह 5 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तक्रारदार अजिंक्य पाटील यांची पत्नी वैद्यकीय अधिवारी म्हणून सीपीआर रुग्णालयात कार्यरत असताना, त्यांना देण्यात आलेले वाढीव वेतन सीपीआर प्रशासनाने कपात करून घेतले होते. याबाबत कोळी याने माहिती अधिकारातून माहिती मिळवून पाटील यांच्या पत्नीच्या नोकरीत अडथळे आणण्याची धमकी देत अजिंक्य पाटील यांच्याकडे पैशाची मागणी करत होता. पैसे देण्यात टाळाटाळ होत असल्याने कोळी याने या दोघांच्या विरोधात माहिती अधिकारात अनेक तक्रारी केल्या होत्या. यातून पाटील यांना अटकही झाली होती.

दरम्यान, यापुढील काळात त्रास होऊ नये यासाठी 20 लाख रुपये खंडणी देण्याची मागणी सहवारी युवराज खराडेमार्फत केली. तसेच ही रक्कम न दिल्यास या दोघांनाही वेगवेगळ्या कारणातून त्रास देण्याची धमकी देण्यात आली होती. अखेर या दोघांमध्ये पंधरा लाख रुपये देण्याचे ठरले.

दरम्यान, याप्रकरणी अजिंक्य पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेऊन तक्रार दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने जयराज कोळी व त्याचा साथीदार युवराज खराडे यांना खंडणीची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. या दोघांवर कागल पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. तर, माहिती अधिकाराचा गैरवापर करत, या दोघांनी ज्यांच्याकडून खंडणी उकळली आहे, त्यांनी पोलिसांत तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;