अखेर रस्ता मिळाला… शंभर वर्षांची प्रतीक्षा संपली, शिंदेवाडी कर्जत ते जुना टाकळी खंडेश्वरी रस्ता खुला

अखेर रस्ता मिळाला… शंभर वर्षांची प्रतीक्षा संपली, शिंदेवाडी कर्जत ते जुना टाकळी खंडेश्वरी रस्ता खुला

कर्जत तालुक्यातील शिंदेवाडी कर्जत ते जुना टाकळी खंडेश्वरी हा रस्ता खुला करण्यात यावा, यासाठी शिंदेवाडी या गावातील व त्या परिसरातील ग्रामस्थांचा तब्बल शंभर वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष आजअखेर संपला. रस्ता खुला झाल्याने ग्रामस्थांनी मोठा जल्लोष केला. यासाठी नगरसेवक प्रा. सतीश पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांनी पुढाकार घेतला होता. या रस्त्याचा सहा गावांना फायदा होणार आहे.

शिंदेवाडी कर्जत ते जुना टाकळी खंडेश्वरी हा रस्ता काही शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी अतिक्रमण करून अडवला होता. गट नंबर 1404, गट नंबर 1402 व गट नंबर 1403 यातील रस्ता खुला करण्यात आला आहे. या रस्त्यासाठी येथील कित्येक पिढय़ांनी संघर्ष केला. तो आजतागायत सुरू होता. याबाबत प्रशासनाकडे मागणी करण्यात येत होती. न्यायालयामध्ये देखील हक्कासाठी संघर्ष सुरू होता. मात्र यश येत नव्हते.

मात्र, नगरसेवक प्रा. सतीश पाटील यांनी या रस्त्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांना या रस्त्याची सर्व माहिती सांगितली. यानंतर घुले यांनी या परिसरातील ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांच्यामध्ये असलेले वाद मिटवत या रस्त्याचे महत्त्व सर्वांना सांगितले. त्यानंतर वरील गटांमधून बारा फुटाचा रस्ता देण्याचे ठरले आणि संबंधित सर्व शेतकऱ्यांनी हा निर्णय मान्य केला. त्यानंतर लगेच जेसीबी मशीनच्या साह्याने शिंदेवाडी ते जुना टाकळी खंडेश्वरी रस्ता हा खुला करण्यात आला. यामुळे येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. अतिशय अशक्यप्राय रस्ता खुला केल्यामुळे प्रवीण घुले व नगरसेवक प्रा. सतीश पाटील यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

यावेळी कर्जत येथील तलाठी प्रशांत जमदाडे, महेश शिंदे, धुळाजी केसकर, ऍड. ऋषिकेश पाटील, माजी सरपंच चंद्रकांत तोरडमल,  बापूसाहेब तोरडमल, माजी उपसरपंच निकेश तोरडमल, सागर नलावडे सुरेश क्षीरसागर, पोपटराव क्षीरसागर, बापूराव तोरडमल, अडबंग तोरडमल, विजय तोरडमल, सुभाष तोरडमल, बापूराव तोरडमल, परशुराम तोरडमल, प्रल्हाद तोरडमल उपस्थित होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;