दुर्घटना घडूनही पर्यटकांची हुल्लडबाजी सुरुच

दुर्घटना घडूनही पर्यटकांची हुल्लडबाजी सुरुच

गतवर्षी लोणावळा येथील भुशी धरणामागील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने पुण्यातील एकाच कुटुंबातील पाचजणांचा बळी गेला होता. तर, मागच्या आठवड्यात कुंडमळा येथे पर्यटकांच्या गर्दीमुळे लोखंडी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार पर्यटकांना जीव गमवावा लागला. मात्र, अशा घटना घडूनही घोकादायक पर्यटन करण्याच्या प्रमाणात घट होताना दिसत नाही. पोलीस प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत काही ठिकाणी पर्यटकांची हुल्लडबाजी सुरूच आहे.

मावळ तालुक्यात शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक हजेरी लावतात. यात हौसे, नवसे व गवशांचा समावेश असतो. असंख्य पर्यटक भुशी डॅम आणि इतरत्र धबधब्याखाली ओलेचिंब होण्यासाठी, तर काही पर्यटक या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी येतात. अशावेळी अतिउत्साही पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्यास दुर्घटनाही वाढतात. ३० जुलै २०२४ रोजी भुशी धरणात बुडून एकाच कुटुंबातील पाचजणांच्या झालेल्या मृत्यूची दुर्दैवी घटना तसेच १५ जून रोजी कुंडमळा येथे पर्यटकांच्या गर्दीमुळे लोखंडी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार पर्यटकांना गमवावा लागलेला जीव, भुशी डॅम भरून वाहू लागल्यानंतर शनिवारी (दि. २१) आणि रविवारी (दि. २२) आलेल्या सुट्टीमुळे लोणावळा परिसरातील पर्यटनस्थळांवर गर्दीचे उधाण आले होते. लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने जागोजागी धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, उत्साहाच्या भरात पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करतात.

पर्यटकांनी पर्यटनस्थळांवर वर्षाविहाराचा आनंद घेताना काळजी घ्यावी. कोणतीही दुर्घटना होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, महिला, मुले व वयस्कर यांना त्रास होणार नाही, याकडेही लक्ष द्यावे. वाहने चालविताना सावकाश वाहने चालवावीत. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होणार नाही, असे पाहावे. नियमांचे पालन करावे; अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.”
– दिनेश तायडे (पोलीस निरीक्षक लोणावळा ग्रामीण)

कातळधार धबधब्यावर प्रतिबंध
पर्यटक, ट्रेकर्स यांचे आकर्षण असलेला लोणावळा शहराजवळील प्रसिद्ध कातळधार धबधबा सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी प्रतिबंधित करण्यात आला असून, वनखात्याने त्या संदर्भात आदेश पारित केले आहेत. राजमाची किल्ल्याच्या मार्गावर असलेल्या कातळधार धबधब्याला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. मात्र, या धबधब्याकडे जाणारी पायवाट निसरडी आणि धोकादायक झाली आहे. तसेच, या मार्गावर अनेक ठिकाणी दरडी सैल झालेल्या असल्याने राजमाची ग्रामस्थांनीच हा धबधबा पर्यटकांसाठी बंद करावा, अशी मागणी पोलीस आणि वन खात्याकडे केली होती. त्या अनुषंगाने कातळधार धबधब्याकडे जाण्यास प्रतिबंध करण्यात आला असून, तसे फलक वनखात्याकडून जागोजागी लावण्यात आले आहेत, अशी माहिती वनपरिमंडल अधिकारी सागर चुटके यांनी दिली. दरम्यान, धबधब्याच्या पाण्यात भिजण्याची मजा लुटण्यासाठी राजमाचीकडे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होऊ नये, यासाठी फणसराई भागात असलेले ५ ते ६ धबधबे पर्यटकांसाठी खुले ठेवण्यात आले आहेत. त्याठिकाणी सुरक्षित पर्यटनाचा आनंद पर्यटकांनी घ्यावा, असे आवाहन वनखात्याकडून करण्यात आले आहे.

यंदा एकही गुन्हा दाखल नाही
पुण्यातील एकाच कुटुंबातील पाचजणांचा बळी गेल्यवानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधित ठिकाणी पर्यटनास मनाई आदेश काढले होते. ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. लोणावळा शहर पोलिसांनी गतवर्षी धोकादायक पर्यटन करणाऱ्या आणि धबधब्याच्या परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या ४८ पर्यटकांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र, यंदा एकाही पर्यटकावर अद्यापि गुन्हा दाखल झालेला नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Skin care: कोरड्या त्वचेसाठी नारळाचे तेल की कोरफड जेल… कोणते आहे सर्वोत्तम? Skin care: कोरड्या त्वचेसाठी नारळाचे तेल की कोरफड जेल… कोणते आहे सर्वोत्तम?
पावसाळा ऋतू सुरू झाला की आपल्याला आरोग्यासोबतच त्वचेची देखील काळजी घ्यावी लागते. खासकरून तेलकट त्वचा, कोरडी त्वचा, संवेदनशील त्वचा असलेल्या...
कच्ची पपई खाल्ल्यास ‘हे’ आजार तुमच्या जवळही येणार नाहीत, या 6 प्रकारे तुमच्या आहारात करा समाविष्ट
Health Tips – वारंवार होणाऱ्या डोकेदुखीवर हा आहे परिणामकारक घरगुती औषधांचा उतारा, वाचा
Pune News – कोकणकड्यावरून उडी घेतली! दरीत आढळले दोघांचे मृतदेह, तलाठी आणि कॉलेज तरुणीचा समावेश
गाझामधील नरसंहारावर पंतप्रधान मोदींच्या मौनाने हिंदुस्थानच्या नैतिक आणि राजनैतिक पतला ठेच बसली, काँग्रेसची टीका
Health Tips- कर्करोग, मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठी हा ज्यूस आहे उपयुक्त, वाचा सविस्तर
Iran-Israel War – इराणमधून 400 किलो युरेनियम गायब; अमेरिकेच्या दाव्याने जगाची चिंता वाढली