पुण्यात पालखी सोहळ्यावेळी 5 लाख वारकरी मुक्कामी; पोलिसांकडून ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे पालखी मार्गावर माहिती संकलित

पुण्यात पालखी सोहळ्यावेळी 5 लाख वारकरी मुक्कामी; पोलिसांकडून ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे पालखी मार्गावर माहिती संकलित

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांमध्ये गर्दीचे नियंत्रण, व्यवस्थापन करण्यासाठी पुणे पोलिसांनी यंदा प्रथमच ‘एआय’ तंत्रज्ञानाचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापर केला. त्यानुसार पालखी मुक्कामी असताना तब्बल पाच लाख वारकरी पुण्यात आल्याची नोंद झाली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात तीन लाख वारकरी आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात दोन लाख वारकरी सहभागी झाल्याची माहिती एआय तंत्रज्ञानाद्वारे मोजणीतून मिळाली आहे.

संतांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची नोंद करण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित कॅमेऱ्यांची मदत घेतली होती. त्यानुसार श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीत दोन लाख ९५ हजार वारकरी सहभागी झाले होते, तर जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात एक लाख ९५ हजार वारकरी सहभागी झाले होते.

पोलिसांनी वेगवेगळ्या भागांत ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे बसविले होते. त्यातील आकडेवारीनुसार पालखी सोहळा पुणे मुक्कामी आल्यावर पाच लाख वारकरी पुण्यात दाखल झाले होते. एआय कॅमेरे नरवीर तानाजीवाडी, संचेती रुग्णालय, वेधशाळा चौक, खंडोजीबाबा चौक, लक्ष्मी रस्ता भागात बसविले होते. कॅमेऱ्यांनी केलेली नोंद आणि माहितीचे विश्लेषण केले असून, हे कॅमेरे प्रस्थानमार्गावर बसविले होते.

पालखी सोहळ्यात तब्बल 2 हजार 600 वाहने पुण्यात
संतांचा पालखी सोहळा शुक्रवारी (२० रोजी) शहरात दाखल झाला होता. श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासोबत जवळपास दोन लाख वारकरी सहभागी झाले होते. तसेच दिंड्यांतील 600 वाहने शहरात आली होती, तर श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यासोबत तीन लाख वारकरी मुक्कामी होते. माउलींच्या सोहळ्यातील तब्बल दोन हजार वाहने शहरात दाखल झाली होती, अशी माहिती ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित विश्लेषणातून करण्यात आली आहे. एआय तंत्रज्ञानामुळे गर्दीचे व्यवस्थापन, नियोजन आणि वाहतूक नियोजनात मदत झाली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त निखिल पिंगळे, वाहतूक उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी गणेश इंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिसांनी पालखी सोहळ्यावेळी विशेष कामगिरी बजाविली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;