दशहरी, चौसा आंब्यांचा हंगाम बहरला

दशहरी, चौसा आंब्यांचा हंगाम बहरला

केशरी-पिवळसर गर, लांबट-गोल आकार, चवीला गोड असलेल्या दशहरी, लंगडा, चौसा आंब्यांचा हंगाम बहरला आहे. उत्तर प्रदेशातून या आंब्यांची आवक वाढली असून, या आंब्यांनाही चांगली मागणी आहे. किरकोळ बाजारात दशहरी, लंगडा आंब्यांना दर्जानुसार प्रतिकिलो 60 ते 80 रुपये तर, चौसा आंब्याला 130 ते 150 रुपये दराने विक्री केली जात आहे.

पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्ड फळबाजारात उत्तर प्रदेशातून दररोज पाच आणि दहा किलोचे सुमारे 8 ते 10 हजार बॉक्स, तर सुट्टे 500 क्रेट्स इतकी या आंब्यांची आवक होत आहे. लखनौ भागातून मलिहाबाद, शाहरंगपूर येथून दशहरी आंब्याची आवक होत आहे. घाऊक बाजारात पाच किलोच्या एका बॉक्सला 300 ते 350, दहा किलोच्या एका बॉक्सला 450 ते 550 रुपये भाव मिळत आहेत. तर किरकोळ बाजारात 60 ते 80 रुपये दराने विक्री होत आहे. मलिहाबाद येथून लंगडा आंबा दाखल होत आहे.

घाऊक बाजारात चौसा आंबा प्रतिकिलोस 35 ते 45 रुपये, तर किरकोळ बाजारात 60 ते 80 रुपये किलो दराने विक्री होत आहे. बनरास येथून चौसा आंब्याची आवक होत असून, घाऊक बाजारात 5 किलोच्या एका बॉक्सला 400 ते 450 रुपये भाव मिळत आहे, अशी माहिती आडतदार सुयोग झेंडे यांनी दिली.

उत्तर प्रदेशातील चौसा, लंगडा, दशहरी या आंब्यांचा हंगाम सुरू झाला आहे. हा हंगाम जूनअखेर ते 15 जुलै या दरम्यान असतो. कोकण हापूसनंतर वर्षातील शेवटचा म्हणून या आंब्यांचा हंगाम असतो. यानंतर पुढील वर्षी आंबा खाण्यास उपलब्ध होतो. हा आंबा पावसाळी असल्याने खराब नसतो व खाण्यास चांगला असतो.
– सत्यजित झेंडे, फळांचे आडतदार, मार्केटयार्ड.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;