पुणे रेल्वे स्थानकाला पेशव्यांचे नाव देण्याची भाजपची मागणी

पुणे रेल्वे स्थानकाला पेशव्यांचे नाव देण्याची भाजपची मागणी

पुणे रेल्वे स्टेशनला ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला अनेक राजकीय पक्ष आणि संस्था, संघटनांनी तीव्र विरोध केला असून, या मागणीमुळे वाद उफाळला आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्याबरोबर अनेक महापुरुषांच्या नावांचा आग्रहदेखील धरला जात आहे.

पुणे आणि सोलापूर विभागाची रेल्वेची बैठक आज पुण्यात पार पडली. या बैठकीला त्या त्या जिह्यातील सर्व खासदार उपस्थित होते. पुणे रेल्वे स्टेशन आणि पुणे शहरासंबंधित प्रश्न या बैठकीत मांडण्यात आले. यावेळी मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे. अशा प्रकारची मागणी अनेक संघटनांनी वेळोवेळी केली आहे. आजच्या बैठकीत मी त्याचा पुनरुच्चार केला आहे.असे सांगितले.

पुण्याची स्थापना राजमाता जिजाऊ यांनी केली आहे. आदिलशहाने पुणे शहर बेचिराख केले होते. या ठिकाणी गाढवाचा नांगर फिरवला मात्र राजमाता जिजाऊ शिवरायांना घेऊन या ठिकाणी आल्या आणि त्यांनी हे शहर पुन्हा वसवण्याचे काम केले. या ठिकाणी त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला. बेचिराक झालेले पुणे नव्याने वसवण्याचे काम राजमाता जिजाऊ यांनी केले. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनला राजमाता जिजाऊ यांचेच नाव देणे संयुक्तीक ठरेल असे इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी म्हटले आहे. मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची केलेली मागणी अत्यंत चुकीची आणि निराधार आहे. मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या मागणीचा आम्ही जाहीर निषेध करतो.

वाद उफाळला; फुले यांच्या नावाचाही आग्रह

माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी मेधा कुलकर्णी यांच्या मागणीला विरोध करताना पुणे रेल्वे स्टेशनला महात्मा जोतिबा फुले किंवा गोपाळकृष्ण गोखले यांची नावे द्यावीत, अशी मागणी केली. तर प्रशांत जगताप यांनी पेशवाईचा संदेश देणे चुकीचे असून, अनेक महापुरुषांनी पुण्यासाठी खूप योगदान दिले असून, त्यांची नावे सुचवणे अपेक्षित होते, असे म्हटले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;