‘नीट’ चाचणीत कमी मार्क पडले, मुख्याध्यापक वडिलांच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू

‘नीट’ चाचणीत कमी मार्क पडले, मुख्याध्यापक वडिलांच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू

‘नीट’ परीक्षेच्या चाचणीत कमी मार्क पडल्याने मुख्याध्यापक असलेल्या वडिलांनी लाकडी खुंट्याने केलेल्या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे शुक्रवारी रात्री घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. साधना भोसले (17) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. वडील धोंडीराम भोसले (41) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

धोंडीराम भोसले हे नेलकरंजी गावातच माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक आहेत. त्यांची मुलगी आटपाडी येथील निवासी विद्यालयात बारावीला होती. महाविद्यालयात नीट चाचणीत तिला कमी मार्क पडले होते. त्यामुळे संतापलेल्या धोंडीराम भोसले यांनी घरातील जात्याच्या लाकडी खुंट्याने मुलीला मारहाण केली. या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली. मात्र, वडिलांनी तिला दवाखान्यात नेले नाही.

दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी धोंडीराम भोसले माध्यमिक विद्यालयात जाऊन आल्यानंतर त्यांना मुलगी बेशुद्ध अवस्थेत दिसली. तिला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. शनिवारी रात्री मुलीचा अंत्यविधी झाला. त्यानंतर मुलीची आई प्रीती धोंडीराम भोसले यांनी रविवारी रात्री आटपाडी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी मुख्याध्यापक वडिलांना अटक केली. न्यायालयाने आरोपीस 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस निरीक्षक विनय बहीर पुढील तपास करीत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;