दिवे घाट पार करून माऊलींची पालखी सासवड मुक्कामी

दिवे घाट पार करून माऊलींची पालखी सासवड मुक्कामी

ग्यानबा-तुकारामांचा जयघोष, टाळ-मृदंगाच्या गजर, भगव्या पताका फडकावत ऊन-पावसाचा अनुभव घेत लाखो वैष्णवांसह संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दिवे घाटाची अवघड चढण पार करून रात्री नऊच्या सुमारास संत सोपानदेवांच्या सासवड भूमीत मुक्कामी दाखल झाला. पालखी तळावर चोपदारांनी हरवलेल्या वस्तूंचा तपशीलासह सुचना आणि मंगळवारी सकाळी निघायचे आहे, असा पुकारा केल्यावर समाजआरती झाली. त्यानंतर दोन दिवसांच्या वास्तव्यासाठी भव्य सोहळा सासवडला विसावला. तत्पूर्वी माऊलींच्या स्वागतासाठी पालखी तळावर पावसाने काही काळ हजेरी लावली.

सकाळी सहा वाजता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सासवडकडे प्रस्थान झाले. पुणे ते हडपसर मार्गावर दर्शन आणि स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रस्त्याने कदम वाकवस्ती मुक्कामाकडे मार्गस्थ झाली. तर, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड रस्त्याने मार्गस्थ झाली.

दुपारच्या सत्रात पालखीचा वडकी येथे विसावा झाल्यावर सायंकाळी साडेचारच्या सुमारास पालखीने दिवे घाट चढण्यास प्रारंभ केला. रस्ता रुंदीकरणांमुळे घाटाची वाट बिकट होणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतल्याने मार्ग सुकर झाला. सायंकाळी सहा वाजता सोहळा घाट माथ्यावर पुरंदर तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करताना बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री दादा जाधवराव, ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, विभागीय अधिकारी वर्षा लांडगे आदींनी पालखीचे स्वागत केले.

झेंडेवाडीमध्ये विश्रांती

झेंडेवाडी येथे विश्रांती घेऊन सोहळा सासवडकडे मार्गस्थ झाला. वाटेत दिवे झेंडेवाडी, काळेवाडी, ढुमेवाडी, पवारवाडी येथील ग्रामस्थ यांच्या स्वागताचा स्वीकार करुन पालखी आठ वाजता चंदन टेकडी येथे नगरपालिका हद्दीत दाखल झाली तेव्हा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोहळ्याचे स्वागत केले. रात्री साडेनऊच्या दरम्यान सोहळा पालखी तळावर पोहोचले. त्यानंतर समाजआरती झाली.

रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी

तालुक्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी करून पालखी आणण्यासाठी सामील झाले होते. माऊलींचा पालखी सोहळा मंगळवारी जेजुरीकडे प्रस्थान ठेवणार असून, उद्या (दि. 23) संत सोपानदेव व संत चांगावटेश्वर यांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. सोहळ्यामुळे अवघी सासवड नगरी माऊलीमय झाली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;