हिंदी भाषा सक्ती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस

हिंदी भाषा सक्ती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस

महाराष्ट्राची व मराठी माणसांची फसवणूक करणे, हिंदी भाषा सक्ती संदर्भात सर्वेच्च न्यायालयाचा हवाला देऊन खोटे बोलणे आणि संविधानिक शपथेचा भंग करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अॅड. असीम सरोदे, अॅड. श्रीया आवले, अॅड. अरहंत धोत्रे व अॅड. रोहीत टिळेकर यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे.

तामीळनाडू सरकारने त्रिभाषा धोरणाला विरोध करणारी याचिका केली आणि सर्वेच्च न्यायालयाने तामीळनाडू सरकारचे ऐकून घेतले नाही. तामीळनाडू सरकारने हिंदी सक्तीला विरोध केला आणि तामीळनाडू सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली असे ध्वनित करणारे वक्तव्य करणे हा खोटारडेपणा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय घेतला तो चुकीचा असल्याने तो निर्णय मागे घ्यावा, मुख्यमंत्र्यांनी खोटेनाटे न पसरविता महाराष्ट्रातील मराठी शाळा अस्तित्वात राहतील यासाठी प्रयत्न करावे, मराठी शाळांचा दर्जा, पोषण आहाराबाबत बोलणे व काम करणे गरजेचे आहे, असे या नोटीसेमध्ये नमूद करण्यात आले आहे. नोटीसला 7 दिवसात उत्तर न दिल्यास ‘शासन पुरस्कृत भाषा-अत्याचाराच्या विरोधात’ न्यायालयात दाद मागावी लागेल, असे अॅड. असीम सरोदे व अॅड. श्रीया आवले यांनी सांगितले.

n 17 हजार 500 मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत त्याबद्दल बोलण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, त्यावर उपाय शोधण्याची हिंमत दाखवावी, शिक्षण हक्क कायद्यानुसार महाराष्ट्र सरकारने राज्यातील विविध शाळांना 2000 कोटी लगेच द्यावे, प्रायव्हेट शाळांमध्ये आर्थिकदृष्टय़ा अक्षम बहुजन समाजातील मुलांना असलेल्या 25 टक्के मोफत प्रवेश द्यावा, त्याची फी सरकारने शाळेला द्यावी, पहिलीपासून हिंदी सक्तीची असणार नाही असे जाहीर करावे, आसे नोटीसीत नमूद केले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;