कान्होबा उर्फ तांबुळदेव येथे आरतीवरून दोन समाजात वाद, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह दंगलपथक घटनास्थळी दाखल

कान्होबा उर्फ तांबुळदेव येथे आरतीवरून दोन समाजात वाद, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह दंगलपथक घटनास्थळी दाखल

पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील कान्होबा उर्फ तांबुळदेव देवस्थान या धार्मिक ठिकाणी आज आरती करण्यावरून दोन समाजातील तरुणांमध्ये शाब्दिक चकमक होऊन धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याने जवखेडे खालसा गावात तणाव निर्माण झाला आहे. अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने या ठिकाणी दंगल विरोधी पथक तैनात केले आहे.

घटनेची माहिती कळताच तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, शेवगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे हे फौजफाटा घेऊन गावात दाखल झाले व त्यांनी दोन्हीही समाजातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्हीही गट आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने या वादावर पडदा न पडल्याने दोन दिवसांनी या विषयवार पाथर्डी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.

जवखेडे खालसागावापासूनदोन किलोमीटर अंतरावर कान्होबा उर्फ तांबुळदेव देवस्थान असून या ठिकाणी धार्मिक विधी करण्यावरून दोन समाजात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहेत. या वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न यापूर्वी महसूल व पोलीस प्रशासनाने केले होते. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. आजकाही तरुणांनी देवस्थानच्या गाभाऱ्यात आरती करण्याचा प्रयत्न केला. त्याला दुसऱ्या गटाने विरोध केला. यावेळी दोन्हीही गटात शाब्दिक चकमक उडाली, त्यानंतर दोन्हीही गटाने एकमेकांना धक्काबुक्की केल्याने गावात तणाव निर्माण झाला.

यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी गावात जात दोन्हीही गटाच्या म्होरक्यांशी चर्चा केली. मात्र, उपयोग न झाल्याने अखेर पाटील यांनी दोन दिवसांनी पाथर्डी पोलीस स्टेशनलाठक आयोजित केली असून, या बैठकीत या विषयवार तोडगा काढण्यात येणार आहे. बैठक होईपर्यंत सर्वानीच गावात शांतता राखावी, असे आवाहन पाटील यांनी केले असून गावात मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गावात झालेल्या बैठकीस सरपंच चारुदत्त वाघ, माजी सरपंच अमोल वाघ, अॅड. वैभव आंधळे, अमोल गवळी, तुषार वाघ, विष्णू घाटूळ, रघुनाथ लांघे, विकास वाघ, हरिचंद्र आव्हाड, राजेंद्र वाघ, संतोष कासार, अॅड. लतीफ शेख, शहाबुद्दीन शेख, मुस्ताक शेख, इसाक शेख, चाँद सय्यद यांच्यासह परिसरातील इतर गावचे तरुण मोठया संख्येने उपस्थित होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;