महाबळेश्वरमध्ये मुसळधार; जनजीवन विस्कळीत, रस्ते खचल्यामुळे गावांचा संपर्क तुटला

महाबळेश्वरमध्ये मुसळधार; जनजीवन विस्कळीत, रस्ते खचल्यामुळे गावांचा संपर्क तुटला

महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाबळेश्वर आणि पाऊस हे समीकरण ठरलेलेच आहे, याचा प्रत्यय गेल्या काही दिवसांपासून येत आहे. जून महिन्याच्या प्रारंभी उघडीप दिलेल्या पावसाने आता महाबळेश्वरला पावसाने झोडपून काढले असून नागरिकांची व पर्यटकांची दैना उडाली आहे. त्यातच तापोळा महाबळेश्वर रस्त्यावर झोळखिंड हद्दीत दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

मुसळधार पावसामुळे शहर व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तापोळा रस्ता चिखली गावच्या हद्दीत वाहून गेला असून, रस्त्यावर दरडी कोसळल्या आहेत. दरम्यान, दरड कोसळलेल्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड माती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रस्ता पूर्ववत सुरू होत नाही तोपर्यंत यामार्गावरील वाहतूक मांघर मार्गे झोंळखिंड वळविण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाबळेश्वर शहरात गेल्या 24 तासांत 189 मि.मी. (7 इंच) या वर्षातील उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे.

महाबळेश्वरमध्ये पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. यामुळे वेण्णालेकच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. ओढे-नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. पावसाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटकांची तुरळक गर्दी येथे दिसून येत आहे. वेण्णालेकसह परिसर दाट धुक्यात हरवून गेला आहे.

प्रसिद्ध लिंगमळा धबधबा ओसंडून वाहत आहे. दि. 1 जून ते 18 जून या कालावधीत 465.6 मि. मी. (18.33 इंच) पावसाची नोंद झाली आहे. तर आज अखेरपर्यंत 24 तासांत एकूण 189 मि.मी (7 इंच), तर एकूण 655 मि.मी. (25 इंच) पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पावसामुळे कामात अडथळा

तापोळा महाबळेश्वर रस्त्यावर झोळखिंड हद्दीत वन विभागाच्या हद्दीत महारोळा खालच्या बाजूस नवीन पाणीप्रवाह निर्माण झाला आहे. तसेच याच लांबीत मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्यामुळे नवीन तयार झालेल्या पाणी प्रवाहामुळे नवीन डांबरी रस्ता 40 मी. लांबी 5 मी. रुंदीचा रस्ता पाण्याच्या लोंढ्यामुळे वाहून गेला. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तीन जेसीबी लावून खड्डा बुजवण्याचे काम प्रगतीत आहे. परंतु, मोठ्या प्रमाणावरील पावसामुळे या कामात अडथळा निर्माण झाला आहे. सद्यःस्थितीत मोठ्या प्रमाणावर लैंड स्लाईड होत असल्यामुळे कुठलाही अपघात होऊ नये या हेतूने मांघर पारुट मार्गे झोळाची खिंड अशी वाहतूक वळविण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी अजय देशपांडे यांनी दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;