बघणारे बघून गेले, मंत्री म्हणून आम्हीच निस्तरणार! कुंडमळा दुर्घटनेनंतर गायब झाल्याने होत असलेल्या टीकेवर अजितदादांची भडास

बघणारे बघून गेले, मंत्री म्हणून आम्हीच निस्तरणार! कुंडमळा दुर्घटनेनंतर गायब झाल्याने होत असलेल्या टीकेवर अजितदादांची भडास

कुंडमळा दुर्घटनेनंतर दोन दिवस गायब असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना घटनास्थळी भेट द्यायला वेळ न मिळाल्याने झालेली टीका त्यांना झोंबल्याचे दिसून आले. श्रीक्षेत्र देहू येथे पत्रकारांशी बोलताना पवार यांनी आपल्यावर होणाऱ्या टीकेवर भडास काढली. ‘पहिल्या दिवशी जे बघून गेले ते फक्त बघून गेले, मंत्री म्हणून निस्तरावे आम्हालाच लागणार आहे. म्हणून शांत डोक्याने दोन दिवसांनंतर सर्व परिस्थितीची माहिती घेतली. माणुसकी आम्हालाही आहे,’
असेदेखील पवार म्हणाले.

कुंडमळा येथील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आपत्तिव्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. मात्र, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना घटनास्थळी भेट देण्यास दोन दिवस वेळ मिळाला नाही. त्यामुळे गायब असलेल्या पवार यांच्याबाबत चर्चेला उधाण आले होते.

पालखी सोहळ्याच्या प्रस्थानानिमित्त अजित पवार यांनी बुधवारी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिर आणि श्रीराममंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार सुनील शेळके, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प. वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प. उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे उपस्थित होते.

पवार म्हणाले, कुंडमळा दुर्घटनेनंतर पंधराव्या मिनिटाला आमच्या पक्षाचा आमदार घटनास्थळी होता. सर्व प्रशासकीय जबाबदार यंत्रणांना सूचना करत मदत देण्याचे आदेश दिले. असे असताना टीका सुरू झाल्या. बघणारे पहिल्या दिवशी बघून गेले. मात्र, आता मंत्री म्हणून आम्हाला सर्व निस्तरावे लागणार आहे. नागरिकांच्या प्रतिक्रिया शांत झाल्यावर या ठिकाणी भेट देऊन सर्व आढावा घेतला. या ठिकाणी नव्याने उभारण्यात येणारा पूल कसा असावा, त्या अनुषंगाने चर्चा केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;