कर्जतच्या क्रीडा संकुलावरून राजकीय कुस्ती, विधानपरिषद सभापतींचा खोडा; आमदार रोहित पवारांनी घेतला महसूलमंत्र्यांची भेट

कर्जतच्या क्रीडा संकुलावरून राजकीय कुस्ती, विधानपरिषद सभापतींचा खोडा; आमदार रोहित पवारांनी घेतला महसूलमंत्र्यांची भेट

आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याने कर्जत तालुक्यातील क्रीडा संकुलाच्या अंतिम मान्यतेसाठी महसूल मंत्रालयात आलेली फाइल प्रलंबित असताना ती मंजूर करण्याऐवजी आता क्रीडा संकुलासाठीची जागाच बदलण्याचा घाट विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी घातला आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन जागा न बदलता प्रलंबित असलेली फाइल मंजूर करण्याची मागणी केली आहे.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता गेल्यापासून कर्जत-जामखेडमध्ये प्रत्येक विकासकामांत राजकारण रंगत असल्याचे दिसत आहे. आमदार झाल्यानंतर कर्जत-जामखेड मतदारसंघात विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा आणि विकासकामे करण्याचा प्रयत्न आमदार रोहित पवार यांच्याकडून होत आहे. यामध्ये रस्त्यांपासून तर विविध शासकीय इमारतींपर्यंत आणि पाणीपुरवठय़ापासून, आरोग्य सुविधांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी कर्जतमध्ये क्रीडा संकुल उभारणीसाठी 6.3 कोटी रुपयांना मंजुरी आणली. मात्र, क्रीडा संकुलासाठी योग्य आणि पुरेशी जागा नसल्याने त्यांनी (बर्गेवाडी) येथील जागा मिळण्यासाठी 2022 पासून पाठपुरावा केला. त्यानुसार तालुका क्रीडा समितीने या जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱयांना दिला. तो विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आणि विभागीय आयुक्तांनी तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला. मंत्रालय स्तरावर या प्रस्तावाला क्रीडा, वित्त व नियोजन या तिन्ही विभागाने मंजुरी दिली.

त्यानंतर अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे गेला. मात्र, त्यांनी यावर कोणताही निर्णय घेतला नाही.

आता विद्यमान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे हा प्रस्ताव प्रलंबित असून, तो प्रस्ताव मंजूर करण्यात यावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी मंगळवारी मंत्री बावनकुळे यांची मंत्रालयात भेट घेऊन याबाबत चर्चाही केली.

जागा बदलण्यासाठी होणार बैठक

एकीकडे आमदार रोहित पवार कर्जतच्या क्रीडा संकुलाच्या जागेसाठी पाठपुरावा करत असताना दुसरीकडे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी क्रीडा संकुलासाठीची जागा बदलण्याची मागणी महसूलमंत्र्यांकडे केली आहे. त्यासाठी त्यांनी बैठकही लावली आहे. यामुळे आमदार रोहित पवार आणि सभापती प्रा. शिंदे यांच्या राजकीय खेळात कर्जतच्या क्रीडा संकुलासाठी आणखी किती दिवस वाटप पहावी लागणार आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एमआयडीसीसारखेच क्रीडा संकुलाचे होणार

वास्तविक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी चौंडी येथे मंत्रिमंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीतच कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती. परंतु, त्यावेळी या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली नाही आणि आता जागा बदलण्याची मागणी सत्तेत असलेल्या सभापतींकडून केली जात आहे. राजकारणापायी कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीला ज्याप्रमाणे ब्रेक लागला, तसे या क्रीडा संकुलाबाबत होऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;