तुकोबारायांच्या पालखीचे आज प्रस्थान, देहूनगरी भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज

तुकोबारायांच्या पालखीचे आज प्रस्थान, देहूनगरी भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज बुधवारी (दि.18) दुपारी अडीच वाजता देहूतील मुख्य देऊळवाडय़ातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. तत्पूर्वी दोन दिवसांपासूनच देहूत भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंडय़ा दाखल झाल्या आहेत. भाविकांच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे.

यंदाचा 340 वा पालखी सोहळा आहे. पालखी सोहळा प्रस्थान कार्यक्रम बुधवारी दुपारी अडीच वाजता मुख्य देऊळवाडय़ातील भजनी मंडपातून सुरू होईल. संस्थानच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. चांदीच्या पालखी रथाचे काम पूर्ण झाले असून त्याला उजाळा देण्यात आला आहे. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या 500 दिंडय़ा देहूत दाखल झालेल्या आहेत. यंदा संस्थानने तीन बैलजोडी स्वतः खरेदी केल्या आहेत, देऊळवाडय़ाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आल्याची माहिती पालखी सोहळ्याचे प्रमुख गणेश महाराज मोरे यांनी दिली. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पुणे जिह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, पेंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत.

पालखी प्रस्थान सोहळा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-पहाटे साडेचार वाजता देऊळवाडय़ात काकडा, पाच वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संस्थानच्या वतीने महापूजा, साडेपाच वाजता संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा, सकाळी सहा वाजता वैपुंठस्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा, सकाळी सहा वाजता पालखी सोहळय़ाचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्या वतीने महापूजा, सकाळी 8 ते 9 यावेळेत गाथा भजनाची सांगता, सकाळी दहा ते बारा या वेळेत देहूकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन, दुपारी बारा ते दोन या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम, इनामदारवाडय़ातून संत तुकाराम महाराज पादुकांचे दुपारी दोन वाजता मुख्य देऊळवाडयात आगमन, पालखी प्रस्थान सोहळ्यास दुपारी अडीच वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमास सुरुवात, पालखीची सायंकाळी पाच वाजता मंदिर प्रदक्षिणा, सायंकाळी साडेसहा वाजता पालखी सोहळा इनामदारवाडय़ात मुक्कामी असा कार्यक्रम असणार आहे.

दरम्यान, देहूत अन्नदानाची तयारी सुरू आहे. वारकऱ्यांना औषध वाटप सुरू आहे. मावळात मागील तीन ते चार दिवसांपासून पाऊस पडत असल्याने इंद्रायणी नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदी काठावर धोक्याचे फलक लावून जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत.

सोहळ्यासाठी देहू नगरपंचायतमध्ये पंट्रोलरुम

जगदुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याप्रसंगी वारकरी-भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. देहू नगरपंचायतीच्या वतीने मुख्य मंदिर व परिसर, इंद्रायणी घाट, वैपुंठस्थान मंदिर, पीएमपी बसस्टॉप, देहूतील मुख्य रस्ते, अनगडशहा बाबा दर्गा, पाण्याचे टँकर उपलब्ध असणारी ठिकाणे, उपचार केंद्र, पोलिस मदत केंद्र आदी 42 ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्याचे पंट्रोलरूम देहू नगरपंचायतमध्ये करण्यात आले असून, तेथे तीन स्क्रीन बसवण्यात आले आहेत. त्या ठिकाणी प्रत्येक विभागाचा एक अधिकारी व कर्मचारी 24 तास उपलब्ध राहणार आहे. अखंड विद्युतपुरवठा सुरू रहावा यासाठी देहू नगरपंचायतीच्या वतीने तीन ठिकाणी उच्च क्षमतेचे जनरेटर बसविण्यात आले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;