दोन हॉटेलांत शिजतंय गोमांस, राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दोन हॉटेलांत शिजतंय गोमांस, राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राहुरी तालुक्यातील गुहा येथे नगर-मनमाड मार्गावर असलेल्या दोन हॉटेलमध्ये गोवंशीय जातीचे शिजलेले मांस आढळून आले. हा धक्कादायक प्रकार हिंदुत्व वादी कार्यकर्त्यांच्या सतर्कते मुळे उघडकीस आला आहे. या प्रकरणी 6750 रुपयांचे 45 किलो गोवंश जातीचे मांस जप्त करून हॉटेल मालकांविरुद्ध राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि. 15) राहुरी पोलीस ठाण्यात नगर-मनमाड रस्त्यावरील गुहा शिवारातील हॉटेल राणी मेवात व हॉटेल मेवात येथे मांस विक्री करण्यात होत असल्याचा कॉल आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हॉटेल मेवात व हॉटेल राणी मेवात येथे एक इसम एका पातेल्यातून शिजलेले मांस बाहेर काढीत असताना आढळून आला. मोहम्मद अली मोहम्मद सहुन (रा. नई, ता. जि. मेवात, हरियाणा) असे त्याचे नावआहे. चौकशीत त्याने पातेल्यात गोवंशीय जातीचे मांस असल्याची माहिती पोलिसांना दिली. या वेळी पोलिसांनी दोन्ही कारवाईत 6 हजार 650 रुपये किमतीचे 45 किलो गोवंश जनावरांचे गोमांस करून जप्त करत त्यातील काही मांस केमिकल तपासणीकरिता राखीव ठेवून उर्वरित मांस जागीच नष्ट केले आहे. पोलीस नाईक प्रवीण बागुल यांच्या फिर्यादीवरून हॉटेल राणी मेवात व हॉटेल मेवातचा मालक मोहम्मद अली मोहम्मद सहुन याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;