जूनच्या मध्यातच उजनी निम्मे भरले

जूनच्या मध्यातच उजनी निम्मे भरले

सोलापूरसह तीन जिह्यांची वरदायिनीअसलेले उजनी धरण यंदा मान्सूनपूर्व पावसामुळे जूनमध्येच 50 टक्क्यांहून अधिक भरले आहे. सायंकाळपर्यंत उजनीत 90 टीएमसी पाणीसाठा होता. दोन महिन्यांपूर्वी मृत साठय़ात गेलेले उजनी धरण मान्सूनपूर्व पावसामुळे जूनच्या मध्यात 50 टक्के भरल्याने पिण्याचे पाणी, शेती आणि उद्योग क्षेत्रासाठी समाधान देणारी घटना आहे.

वरदायिनी उजनीमध्ये 14 मेपर्यंत पाणीपातळी वजा 23 टक्क्यांपर्यंत आलेली असताना, 18 मे पासून भीमा खोऱयात मान्सूनपूर्व पाऊस व अवकाळी पावसाच्या दणक्याने उजनीतील पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. भीमा व नीरा नद्या दुथडी भरून वाहत असून, बंडगार्डन आणि दौंडमधून उजनीत मोठय़ा प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने जूनच्या मध्यालाच उजनी फिफ्टी प्लसमध्ये आले आहे. सध्या उजनी धरणामध्ये येणारी आवक वाढत आहे. सोमवारी सायंकाळी पुणे बंडगार्डनमधून 14545 क्युसेक, तर दौंड येथून 11 हजार 719 क्युसेकने विसर्ग सुरू होता.

उजनीत सध्या एकूण पाणीसाठा 90 टीएमसी, तर उपयुक्त पाणीसाठा 27 टीएमसी इतका आहे. घाटमाथा व भीमा खोऱयात पाऊस वाढला असून, भीमाशंकर ते पुणे दरम्यान कोसळधारा सुरूच आहेत

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;