मुसळधार पावसाने शिराळा, वाळवा, पलूसला झोडपले

मुसळधार पावसाने शिराळा, वाळवा, पलूसला झोडपले

गेले दोन दिवस पावसाचा जोर कमी झाल्यानंतर रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला. सोमवारी पहाटे जिह्यात मुसळधार पाऊस झाला. शिराळा, वाळवा, पलूस तालुक्याला पावसाने झोडपून काढले. मिरज, तासगाव, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. दुपारनंतर पावसाने उघडीप दिली असली तरी वातावरणात गारवा वाढला आहे.

सांगली जिह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी मध्यरात्रीपासून पुन्हा पाऊस सुरू झाला. आज पहाटे पावसाचा जोर वाढला. जिह्याच्या बहुतांशी भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. शिराळा तालुक्यातील चरण मंडलात अतिवृष्टी झाली. तेथे तब्बल 65.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोकरुड, शिराळा, शिरसी, सागाव आणि मांगले परिसराला पावसाने झोडपले. पावसाचा जोर मोठा असल्याने ओढे, नाले ओसंडून वाहत होते. वाळवा तालुक्यातील कोरेगाव, कुरळप, तांदूळवाडी, पेठ, कासेगाव, आष्टा, कामेरी आणि चिकुर्डे परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली.

पलूस तालुक्यातील भिलवडी, नागठाणे, कुंडल, दुधोंडी, अंकलखोप परिसरात जोराचा पाऊस झाला. तासगाव तालुक्यातील मांजर्डे, विसापूर, सावळज, वायफळे या परिसरात पाऊस झाला. मिरज पश्चिम भागातही सोमवारी पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर पावसाने उघडीप घेतली होती, मात्र ढगाळ वातावरण होते.

सांगली शहर परिसरात जोरदार पाऊस झाला. सकाळपासून पावसाच्या सरी बरसत राहिल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. उन्हाळी सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्या, मात्र शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना पावसात भिजावे लागले.

जिह्यात 16.6 मिलिमीटर पाऊस

सांगली जिह्यात सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत 16.6 मि.मी. पावसाची नोंद झाली. मिरज 15.4 मि.मी., जत 1, खानापूर 4.8, वाळवा 27.3, तासगाव 10.7, शिराळा 43, आटपाडी 1, कवठेमहांकाळ 4.5, पलूस 16.6 आणि कडेगाव तालुक्यात 14.7 मिलिमीटर पाऊस झाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;