99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; शिवेंद्रराजे भोसले यांची स्वागताध्यक्षपदी निवड

99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; शिवेंद्रराजे भोसले यांची स्वागताध्यक्षपदी निवड

साताऱ्यात होत असलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली.

साताऱ्यात मसाप, शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशन या संस्थांनी मागणी केल्यानुसार साताऱ्यात हे 99 वे संमेलन होणार आहे. या दोन्ही संस्थांची संयुक्त बैठक नुकतीच झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव सुचवले त्याला साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, साहित्यिक डॉ. उमेश करंबेळकर यांनी अनुमोदन दिले. यावेळी उपस्थित असलेल्या दोन्ही संस्थांच्या सर्व सदस्यांनी मंत्री शिवेंद्रराजे यांची एकमताने 99 निवड केली.

या बैठकीस मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, चंद्रकांत बेबले, विक्रम पाटील, अजित साळुंखे, संजय माने, सचिन सावंत, सदस्य वजीर नदाफ, आर. डी. पाटील, अमर बेंद्रे, ज्योती कुलकर्णी, अश्विनी जठार, अनिल जठार, तुषार महामूलकर उपस्थित होते.

दुग्धशर्करा योग
साताऱ्यात यापूर्वी 66 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1993 साली झाले होते. या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष म्हणून दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांनी काम पाहिले होते. स्व. अभयसिंहराजेंनंतर त्यांच्या मुलाला शिवेंद्रराजे यांना स्वागताध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;