दौंड-पुणे शटल रेल्वेत आग; इंजिनापासून तिसऱ्या डब्यात घडली घटना

दौंड-पुणे शटल रेल्वेत आग; इंजिनापासून तिसऱ्या डब्यात घडली घटना

दौंड ते पुणेदरम्यान धावणाऱ्या शटल रेल्वेला आज सकाळी आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमुळे डब्यामध्ये धुराचे लोट पसरले होते. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दररोज सकाळी सात वाजता ही रेल्वे दौंडमधून पुण्याकडे धावते. या रेल्वेमध्ये सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यामुळे यातील प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

इंजिनापासून तिसऱ्या डब्याला ही आग लागली होती. यामध्ये एक वयोवृद्ध प्रवासी अडकले होते. मात्र सहप्रवाशांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार डेमू ट्रेनच्या टॉयलेटमध्ये ही आग लागली. यावेळी एक प्रवासी आत होता. दुर्दैवाने दरवाजा लॉक झाल्यामुळे तो बाहेर पडू शकत नव्हता. काही वेळातच टॉयलेटमधून धूर बाहेर येऊ लागला आणि आतमधील व्यक्तीने आरडा-ओरड केली. हे लक्षात येताच काही सतर्क प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत दरवाजाकडे धाव घेतली. त्यांनी दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांनी दरवाजा तोडून अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचला.

या घटनेची माहिती प्रवाशांनी तातडीने स्टेशन मास्तरला दिली. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे कर्मचाऱयांकडून प्रयत्न करण्यात आले. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असून ही बाब गंभीर आहे. अशा आगीच्या घटना थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;