तज्ञ सल्लागार नेमणुकीअभावी शहरातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट थांबले

तज्ञ सल्लागार नेमणुकीअभावी शहरातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट थांबले

दोन वर्षापुर्वी महापालिकेने मोठय़ा पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट केल्यानंतर अकरा पुलांची कामे पुर्ण केली गेली आहे. मात्र, आता शहरातील जुन्या सुमारे साडेसहाशे पुलांचे आणि कल्व्हर्टचे स्ट्रक्चरल ऑडीट हे तज्ञ सल्लागाराच्या नेमणुकीअभावी रखडली आहे. त्यामुळे सल्लागारांच्या भरोशावर सुरू असलेल्या महापालिकेचा कारभार कधी सुधारणार असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील पुल पडल्याच्या पार्श्वभुमीवर पुणे शहरातील पूल आणि कल्व्हर्टच्या स्ट्रक्चरल ऑडीटचा मुद्दा समोर आला. शहरातून मुळा आणि मुठा या दोन मोठय़ा नद्या, राम नदी तसेच आंबिल ओढा, माणिक नाला, भैरोबा नाला, नागझरी आदी मोठे ओढेही आहेत. या नदी आणि ओढय़ांवर पुलांची उभारणी केली गेली आहे. गेल्या काही वर्षांत पावसाचे स्वरुप बदलले आहे. कमी वेळात जास्त पाऊस पडण्याच्या घटना घडत आहे. मात्र, शहरातील पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा विषय अद्याप तज्ञ सल्लागार नियुक्त करण्यावरच अडकून पडला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;