धोकादायक झाडांचे प्रस्ताव निकाली; उद्यान विभागाचा दावा

धोकादायक झाडांचे प्रस्ताव निकाली; उद्यान विभागाचा दावा

पुणे शहरात दोन ठिकाणी झाडाच्या मोठ्या फांद्या पडून झालेल्या घटनेत दोनजणांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर जाग आलेल्या पालिकेच्या उद्यान विभागाने धोकादायक झाडे, फाद्यांचे आलेले सर्व सुमारे 309 प्रस्ताव निकाली काढले आहेत. दोन महिन्यांत साडेसातशे ठिकाणी कामे केल्याचा दावाही उद्यान विभागाने केला आहे.

एरंडवणे आणि नीलायम थिएटरजवळ झाड्याच्या मोठ्या फांद्या पडून दोनजणांना जीव गमवावा लागला होता. धोकादायक झाडे आणि फाद्यांची तक्रार करूनही महापालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तसेच सोसायट्यांनी प्रस्ताव दिल्यानंतरही लवकर धोकादायक झाडे व फांद्या छाटण्याची परवानगी मिळत नाही.

पूर्वी धोकादायक झाडे, फांद्या छाटण्याची किंवा तोडून काढण्याची परवानगी उद्यान विभागाच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडून दिली जात होती. त्यामुळे अनेक प्रकल्प प्रलंबित राहत होते. परवानगी लवकर दिली जावी, नागरिकांची अडचण होऊ नये, यासाठी परवाना देण्याच्या कामाचे विक्रेद्रीकरण करून हे अधिकार क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावरील समितीला दिले आहेत. मात्र, विकेंद्रीकरण करूनही प्रस्ताव रखडत असल्याचा अनुभव नागरिकांना येतो. शहरात विविध ठिकाणी झाडे पडणे, झाडांच्या धोकादायक फांद्या पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये दोन जीव गेल्यानंतर पालिकेच्या उद्यान विभागाच्या कारभाराचे सर्वत्र वाभाडे निघाले. त्यानंतर उद्यान विभागाने शहरातील सर्व धोकादायक झाडे, फांद्या काढत प्रलंबित सर्व प्रस्ताव मंजुरी देत निकाली काढले.

दरम्यान, पाच-सहा महिने पाठपुरावा करूनही परवानगी न मिळाल्याने काही सोसायट्या स्वतःच झाडे, फांद्यांची छाटणी करण्याचे काम हाती घेतात. मात्र, अशावेळी या विभागाचे साटेलोटे असलेले आणि टपून बसलेल्या वृक्षप्रेमींना जाग येते. मग ते कापलेल्या झाडांचे फांद्याचे फोटो काढून तक्रारीची भीती दाखवून ब्लॅकमेलिंगचे प्रकार घडतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;