मटार महाग तर घेवड्याच्या भावात घट; मागणी कमी झाल्याने दर घसरले

मटार महाग तर घेवड्याच्या भावात घट; मागणी कमी झाल्याने दर घसरले

पावसामुळे पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात राज्यासह परराज्यांतून फळभाज्यांची आवक साधारण होत आहे. आवक कमी झाल्यामुळे मटारचे भाव तेजीत होते, तर मागणी कमी झाल्याने घेवड्याच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेने दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली होती. तर मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे इतर सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेने स्थिर होते.

गुलटेकडी मार्केटयार्डात रविवारी (दि. १५) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे १८ ते २० टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ३ ते ४ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा ४ ते ५ टेम्पो, इंदोर येथून गाजर ५ ते ६ टेम्पो, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश येथून घेवडा ३ ते ४ टेम्पो, हिमाचल प्रदेश ३ टेम्पो मटार, कर्नाटकातून पावटा २ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून कैरी ३ ते ४ टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे ८ ते १० टेम्पो तर इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ४० ते ४५ टेम्पो इतकी आवक झाली होती. स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ५५० ते ६०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार क्रेट, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, काकडी ७ते ८ टेम्पो, फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ५ ते ६ टेम्पो, गाजर ४ ते ५ टेम्पो, भुईमूग शेंग १०० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा सुमारे ७० ते ७५ टेम्पो इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केटयार्डमधील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

पुदिना, चवळईच्या भावात वाढ
पावसामुळे पालेभाज्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी बाजारात पालेभाज्यांची आवक कमी प्रमाणात होत आहे. पुदिना, अंबाडी, चुका आणि चवळईच्या भावात वाढ झाली असून कोथिंबीर, शेपू, पालकच्या भावात काहीशी घट झाली होती. गुलटेकडी मार्केटयार्डातील घाऊक बाजारात रविवारी (दि. १५) कोथिंबिरीची सुमारे ९० हजार जुडी, तर मेथीची २० हजार जुडींची आवक झाली होती.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव कोथिंबीर १००० ते २५००, मेथी : २०००-३५००, शेपू : ८००- १५००, कांदापात १५००-२०००, चाकवत: ५००-८००, करडई : ४००-६००, पुदिना: ५००-१०००, अंबाडी: ५००-८००, मुळे: १२००-१५००, राजगिरा : ४००- ७००, चुका ५००-१०००, चवळई : ५००-८००, पालक : १५००-२०००.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;