पुण्यात गुंड शाहरुख शेख चकमकीत ठार

पुण्यात गुंड शाहरुख शेख चकमकीत ठार

पुण्यातील टिपू पठाण टोळीतील गुंड शाहरुख ऊर्फ अट्टी रहीम शेख (23) हा रविवारी पहाटे सोलापूर जिह्यातील मोहोळ तालुक्यात लांबोटी येथे पुणे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर त्याने गोळीबार केला आणि त्यानंतर चकमक उडाली. शाहरुख याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, खंडणीसारखे गंभीर स्वरूपाचे 15 गुन्हे दाखल असून, तो गेल्या काही महिन्यांपासून फरार होता.

शेख हा सराईत गुंड टिपू पठाण याच्या टोळीचा साथीदार होता. पठाणने त्याच्या साथीदारासह हडपसर येथील एका जागेवर ताबा मारून शेड ठोकले होते. त्यानंतर ती जागा पुन्हा मालकाला देण्यासाठी 20 लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी पठाण याच्यासह सात ते आठजणांवर खंडणी आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. यात शाहरुख हा आरोपी होता. त्याचा शोध घेत असताना, तो राजू अहमंद शेख याच्या घरी राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मदन कांबळे, अंमलदार विनोद शिवले, अमित कांबळे, अकबर शेख यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

खंडणी, मोक्कातील पाहिजे आरोपी असलेल्या शेख याला पकडण्यासाठी पथक सोलापूरला गेले होते. त्याला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पथकावर त्याने प्रथम हल्ला केला. त्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी फायर केले. शाहरुख हा मागील तीन महिन्यांपासून फरार होता. – निखिल पिंगळे,  पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;