कर्जबाजारी एक्स-रे टेक्निशियनने हडपसरमध्ये मारला तिजोरीवर डल्ला; 48 तोळे सोने, डायमंड घेऊन फरार आरोपीला बेड्या

कर्जबाजारी एक्स-रे टेक्निशियनने हडपसरमध्ये मारला तिजोरीवर डल्ला; 48 तोळे सोने, डायमंड घेऊन फरार आरोपीला बेड्या

हडपसर भागातील एका नामांकित सोसायटीतील फ्लॅटमधून 48 तोळे सोने-चांदीसह तिजोरीच चोरून पसार झालेल्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. घरफोडीनंतर पळून जाण्यासाठी आरोपीने चोरीची आणि नंबर नसलेल्या दुचाकी वापर केला. मात्र, पथकाने सलग 23 दिवस पुण्यासह बार्शी, सोलापूर, धाराशिव, परांडा भागात तपास करून आरोपीचा माग काढला. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रोहित विलास अंधारे (वय 25, रा. भांडगाव, ता. परांडा, धाराशिव, सध्या. रा. खराडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अंधारे हा एका खासगी रुग्णालयात एक्स-रे टेक्निशियन म्हणून नोकरी करीत होता. मात्र, व्यसनाधीन आणि कर्जबाजारी झाल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 18 मे रोजी हडपसर परिसरातील एका फ्लॅ टमधून ४८ तोळे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत हडपसर आणि गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास सुरू होता.

यादरम्यान पोलिसांना नंबर नसलेली संशयित दुचाकी मिळाली. याच दुचाकीचा वापर करून आरोपीने घरफोडी केल्याचे सीसीटीव्हीतून समजले. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. जवळपास 170 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तसेच धाराशिव, भूम, सोलापूरसह विविध भागात शोधमोहीम राबविली. गुन्हे शाखेच्या पथकाने सलग 23 दिवस तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे तपास करून आरोपीला मांजरी भागातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 48 तोळे सोने, डायमंडचे दागिने, चांदी आणि दुचाकी जप्त केली. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, संदीपान पवार, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, सी. बी. बेरड, अंमलदार बाळू गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, अजित शिंदे, अमोल सरतापे, विनायक येवले, मनोज खरपुडे, जहांगीर पठाण, श्रीकांत दगडे आदींसह पथकाने ही कारवाई केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;