श्री विठ्ठल-रुक्मिणीचे आजपासून टोकन दर्शन, 1200 भाविकांना मिळणार दर्शन; मंदिराच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन बुकिंगची सोय

श्री विठ्ठल-रुक्मिणीचे आजपासून टोकन दर्शन, 1200 भाविकांना मिळणार दर्शन; मंदिराच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन बुकिंगची सोय

श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळावे म्हणून मंदिर समितीच्या वतीने टोकन दर्शन प्रणालीची 15 जूनपासून प्रथम चाचणी घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने प्रथम चाचणी दिवशी सुमारे 1200 टोकन उपलब्ध होणार आहेत. भाविकांनी टोकन दर्शनाचे बुकिंग मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करावे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

तिरूपती बालाजी येथे भाविकांना दर्शनासाठी टोकन पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच टोकन दर्शन पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ व जलद दर्शन देण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, बंगळुरू यांच्याकडून सेवाभावी तत्त्वावर टोकन दर्शन प्रणाली विकसित करून घेण्यात आली आहे. दरवर्षी वारकरी भाविकांची वाढती संख्या पाहता, भविष्यात दर्शनरांग आणि भाविकांच्या सोयींच्या योग्य व्यवस्थापनावर काम करणे अत्यावश्यक आहे. या प्रणालीद्वारे भाविकांना आधीच दर्शनाची वेळ निश्चित करून दर्शनासाठी रांगेत न थांबता, ठराविक वेळेत दर्शन हॉलच्या माध्यमातून मंदिरात प्रवेश करता येणार आहे. ही प्रणाली विशेषतः गर्दीच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन, भाविकांचा वेळ व श्रम वाचण्यास मदत होण्यास प्रभावी ठरणार आहे.

टोकन दर्शन प्रणालीच्या प्रथम चाचणीचे टोकन www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावरून बुकिंग करता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने तयार झालेले टोकन प्रिंट करून निश्चित करून दिलेल्या वेळी श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, पंढरपूरच्या उत्तरेकडील मागीस बाजूस प्रवेश करून टोकनची पडताळणी करून घेतली जाणार आहे. त्यानंतर दर्शन हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. वेळेनुसार थेट दर्शन रांगेत प्रवेश होऊन भाविकांचे सुलभ दर्शन होणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

टोकन दर्शन प्रणालीची प्रथम चाचणी घेण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप येथील दुरुस्त्या व तिसऱ्या माळ्यावर प्रतीक्षा हॉल तयार केले आहेत. तेथे बैठक व्यवस्था, प्रसाधन गृह, पिण्याचे पाणी, चहा, सुरक्षारक्षक, दिशादर्शक व आपत्कालीन मार्ग फलक, सीसीटीव्ही कॅमेरे आदी व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रथम चाचणीचा शुभारंभ मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते व सर्व सदस्य महोदयांच्या उपस्थितीत श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप येथे उद्या (दि. 15) सकाळी 10 वाजता होणार असल्याचे या वेळी व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;