खेळाप्रमाणेच राजकारणातही टीमवर्क गरजेचे! आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

खेळाप्रमाणेच राजकारणातही टीमवर्क गरजेचे! आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

‘कोणत्याही खेळामध्ये खेळाडू एकटा खेळताना दिसत असला, तरी त्याच्याबरोबरच इतर खेळाडू, कुटुंबाचा आणि लोकांचा पाठिंबा असतो. त्यामुळे खेळ हे एक टीमवर्क आहे. त्याचप्रमाणे राजकारणातसुद्धा टीमवर्क गरजेचे असते,’ असे प्रतिपादन शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केले.

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने शिवशक्ती महिला संघ आयोजित महाराष्ट्रातील पहिल्या युवा महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर, जिल्हा सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक, आमदार बाबाजी काळे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरचिटणस बाबूराव चांदेरे, उपाध्यक्ष संजोग वाघेरे, शिवशक्ती महिला संघाचे राजेश पाडळे, माजी आमदार गौतम चाबूकस्वार, शिवसेना संघटक वसंत मोरे, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सांगली, मुंबई उपनगर पूर्वची विजयी सलामी

मुलांमध्ये सांगली, तर मुलींमध्ये मुंबई उपनगर पूर्व या संघांनी आपआपल्या प्रतिस्पर्धी संघांना धूळ चारत पहिल्या ‘आदित्य चषक’ 18 वर्षांखालील मुले व मुली राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत दणक्यात विजयी सलामी दिली. मुलींच्या पहिल्या सामन्यात मुंबई उपनगर पूर्वने मुंबई शहर पश्चिमचा 45-35 असा पाडाव केला. मध्यंतरापर्यंत अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात उपनगरकडे 23-17 अशी आघाडी होती. उत्तरार्धात मात्र उपनगराच्या सेरेना म्हसकर, प्रांजल जाधव, आस्था सिंग यांनी अधिक जोशपूर्ण खेळ करीत सामना आपल्या बाजूने झुकविला.

< या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा आयोजक शिवसेना उपनेते, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर,  सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, राज्य कबड्डी संघटनेचे सचिव बाबूराव चांदेरे, खजिनदार मंगल पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;